Weekly Horoscope 10-16 March 2024 : मार्च महिन्याचा नवीन आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मेष आणि कर्क राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मार्चचा नवीन आठवडा (10 March To 16 March Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.


मेष रास (Aries)


मेष राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक तणावात असतील, या काळात तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या. आठवड्याच्या मध्यात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला सर्वतोपरी सुख मिळेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचा व्यावसाय सुधारेल, तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नवीन आठवड्याच तुम्ही घरात काही उपयुक्त वस्तू खरेदी कराल, जी कुटुंबासाठी देखील गरजेची असेल. नवीन आठवड्यात तुमचं वैयक्तिक आयुष्यही चांगलं राहील.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला उत्तम आरोग्य लाभेल. वैयक्तिक जीवनातील चढ-उतारानंतर आता आनंदी काळ सुरू होईल. तुमचं वैयक्तिक जीवन सुधारेल. जोडीदारासोबत चांगली केमिस्ट्री राहील. व्यवसायाशी संबंधित प्रवासातून तुम्हाला लाभ मिळेल. आठवड्याच्या मध्यात मानसिक ताण वाढेल, या काळात तुमती तब्येत खालावेल. नवीन आठवड्यात तुम्ही धार्मिक कार्यात अधिक रस दाखवाल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी तोट्याचं ठरू शकतं. आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. मित्र परिवारासोबत तुम्ही तुमचा वीकेंड एन्जॉय कराल. नवीन आठवड्यात तुमच्या नोकरीत बदल होऊ शकतो. तुम्ही ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला शारीरिक समस्यांनी त्रस्त असतील. मानसिक तणाव वाढेल. नवीन आठवड्यात तुमचा खर्च वाढेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी मेहनत घ्या, त्याचं उत्तम फळ मिळेल. आठवड्याच्या मध्यात व्यवसायात काही नवीन डील फिक्स होतील. काही नवीन संपर्क तुमच्याशी जोडले जातील, ज्यामुळे व्यवसायात वाढ होईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत काही महत्त्वाचं काम सुरू करू शकता. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमची लव्ह लाईफ उत्तम राहील, जोडीदाराशी जवळीक वाढेल, काही खर्च वाढतील. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या लव्ह लाईफचा आनंद घेतील. तुम्ही तुमच्या तल्लख बुद्धीने तुमच्या आठवड्याची सुरुवात चांगली कराल. नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आठवड्याच्या मध्यात विरोधक तुम्हाला काही प्रमाणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांना यश मिळणार नाही. नोकरीत तुमची स्थिती चांगली असेल. तुमच्याकडून काही खर्च होतील, पण ते आवश्यक गोष्टींवर असतील आणि भविष्यात तुम्हाला त्यांचा फायदा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचं वैवाहिक जीवन बहरेल, जोडीदारासोबतची जवळीक वाढेल, रोमान्स असेल. जोडीदारासोबत तुमचं ट्यूनिंग वाढेल. व्यवसायासाठी हा काळ अतिशय उत्तम राहील, तुमची व्यवसायात चांगली प्रगती होईल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मुलांसोबत आनंदी राहतील, तुम्ही मुलांसाठी वेळ काढाल. नवीन आठवड्यात तुम्हाला अपत्यप्राप्तीचं सुख मिळेल. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला राहील. या काळात तुमचं उत्पन्न वाढेल. आठवड्याच्या मध्यात नोकरीत तुम्ही चांगली कामगिरी कराल. नवीन आठवड्यात जास्त खर्च नक्कीच होईल, पण त्यामुळे तुम्हाला आनंदही मिळेल. आठवड्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वाद होऊ शकतात. व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील, काही नवीन संपर्क जोडले जाऊ शकतात. नवीन आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक जीवनात व्यस्त राहतील. या काळात तुम्ही तुमच्या कामावरही लक्ष केंद्रित कराल, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही थोडे व्यस्त असाल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या लव्ह लाईफचा पूर्णपणे आनंद घ्याल, प्रियकराशी तुमची जवळीक वाढेल. नात्यात चांगली केमिस्ट्री आणि रोमान्स असेल. या आठवड्यात तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. उत्पन्न वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वासही उंचावला जाईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचं कोणाशी तरी भांडण होऊ शकतं. जास्त खर्चामुळे तुम्हाला मानसिक त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणीही कामाचा ताण असेल, तुमची तब्येत या काळात बिघडू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Uday : अवघ्या 8 दिवसांनी होणार शनीचा उदय; मेषसह 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळणार