Electoral Bonds Case Update : सर्वोच्च न्यायालयाने SBI ला दणका दिला असून निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगालाही ही माहिती जारी करण्यास 15 मार्चपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) मुदतवाढ मिळणार का? याचा फैसला आज होणार होता. SBI ने 30 जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने  SBIला दणका देत उद्याच कामकाज संपण्यापूर्वी माहिती देण्यास सांगितली आहे. 






ADR (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स) ने इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. यापूर्वी दिलेल्या निकालात SBI 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाकडे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, प्रशांत भूषण यांनी ADR ने दाखल केलेल्या अवमान याचिका mention केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या