Panchank Yog 2025 : सूर्य-शनिमुळे जुळून येणार दुर्लभ 'पंचांक योग'; 3 जूनला 'या' राशींना अचानक होणार धनलाभ, पैसा हातात खेळणार
Panchank Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 3 जून रोजी मान-सन्मान दाता सूर्य ग्रह आणि न्यायदेवता शनि देव मिळून पंचांक योग निर्माण करणार आहेत.

Panchank Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने संक्रमण करुन शुभ आणि राजयोग निर्माण करतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, 3 जून रोजी मान-सन्मान दाता सूर्य (Sun) ग्रह आणि न्यायदेवता शनि देव (Shani Dev) मिळून पंचांक योग निर्माण करणार आहेत. हा योग एकमेकांच्या 72 डिग्री कोनाच्या स्थितीत असणार आहे. हा योग जुळून आल्यामुळे अनेक राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी पंचांक योग फार लाभदायक ठरणार आहे. या योगामुळे तुम्हाला समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या पडू शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, व्यवसायाचा विस्तार देखील तुमचा वाढलेला दिसेल. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. तसेच, अचानक धनलाभ देखील मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रहाचा पंचांक योग फार खास ठरणार आहे. या काळात सूर्य ग्रहाच्या प्रभावामुळे तुमचा समाजात चांगला मान-सन्मान वाढेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. करिअरमध्ये तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येईल. या काळात तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करता येतील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
पंचांक योगामुळे धनु राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार आहे. या काळात जर तुम्हाला परदेशात प्रवास करायचा असेल तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तसेच, मुलांच्या बौद्धिक क्षमतेला चांगली गती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















