Navratri 2022 : नवरात्रीच्या आठव्या दिवशी करा महागौरीची मनोभावे पूजा, जाणून घ्या देवीची पूजा पद्धत, महत्त्व, मंत्र
Navratri 8th Day : नवरात्रीच्या आठव्या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी कन्यापूजाही केली जाते. जाणून घ्या देवी महागौरीची पूजा पद्धत
Navratri 8th Day : आज सोमवार, 3 ऑक्टोबर, शारदीय नवरात्रीचा आठवा दिवस. शारदीय नवरात्रीच्या (Navratri 2022) आठव्या दिवशी, देवीचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी कन्यापूजाही केली जाते. महागौरीने श्वेत रंगाचे वस्त्र आणि दागिने परिधान केले आहेत. तिला चार हात आहेत आणि बैल तिचे वाहन आहे. महागौरी हे देवी पार्वतीचेच एक रूप आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीने भगवान महादेवांची कठोर तपस्या केल्यानंतर त्यांना पती म्हणून प्राप्त केले होते. महागौरीच्या उपासनेने साधकाला धन, वैभव, सुख-समृद्धी प्राप्त होते. महागौरीला प्रसन्न करण्यासाठी सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रयंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. जाणून घ्या देवी महागौरीची पूजा पद्धत, महत्त्व आणि मंत्र
काय आहे पौराणिक आख्यायिका?
एका पौराणिक कथेनुसार, त्यानंतर देवी पार्वती महादेवांवर नाराज होऊन लांब जाऊन तपस्येसाठी बसते. जेव्हा महादेव पार्वतीला शोधतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. पार्वतीचा रंग, वस्त्र आणि अलंकार पाहून ते पार्वतीला गौर वर्णाचे वरदान देतात.
देवी महागौरी पूजा विधि
सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घाला.
देवीच्या मूर्तीला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालावे.
देवीला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. धार्मिक मान्यतेनुसार देवीला पांढरा रंग आवडतो.
आंघोळीनंतर देवीला पांढरे फूल अर्पण करावे.
देवीला कुंकू लावावा.
देवीला मिठाई, काजू, फळे अर्पण करा.
महागौरी देवीला काळे हरभरे अर्पण करा.
देवी महागौरीचे अधिकाधिक ध्यान करा.
देवीची मनोभावे आरतीही करावी.
अष्टमीच्या दिवशी मुलींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे.
दिवशी कन्यापूजनही करावे.
देवी महागौरी मंत्र
मंत्र: या देवी सर्वभूतेषु माँ गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥
ध्यान मंत्र
वन्दे वांछित कामार्थेचन्द्रार्घकृतशेखराम्।
सिंहारूढाचतुर्भुजामहागौरीयशस्वीनीम्॥
पुणेन्दुनिभांगौरी सोमवक्रस्थितांअष्टम दुर्गा त्रिनेत्रम।
वराभीतिकरांत्रिशूल ढमरूधरांमहागौरींभजेम्॥
पटाम्बरपरिधानामृदुहास्यानानालंकारभूषिताम्।
मंजीर, कार, केयूर, किंकिणिरत्न कुण्डल मण्डिताम्॥
प्रफुल्ल वदनांपल्लवाधरांकांत कपोलांचैवोक्यमोहनीम्।
कमनीयांलावण्यांमृणालांचंदन गन्ध लिप्ताम्॥
स्तोत्र मंत्र
सर्वसंकट हंत्रीत्वंहिधन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदाचतुर्वेदमयी,महागौरीप्रणमाम्यहम्॥
सुख शांति दात्री, धन धान्य प्रदायनीम्।
डमरूवाघप्रिया अघा महागौरीप्रणमाम्यहम्॥
त्रैलोक्यमंगलात्वंहितापत्रयप्रणमाम्यहम्।
वरदाचैतन्यमयीमहागौरीप्रणमाम्यहम्॥
कवच मंत्र
ओंकार: पातुशीर्षोमां, हीं बीजंमां हृदयो।
क्लींबीजंसदापातुनभोगृहोचपादयो॥
ललाट कर्णो,हूं, बीजंपात महागौरीमां नेत्र घ्राणों।
कपोल चिबुकोफट् पातुस्वाहा मां सर्ववदनो॥
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
महत्वाच्या बातम्या
- Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत
- Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय