Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात असतो तणाव; छोट्या-छोट्या कारणांवरुन उडतात खटके
Numerology Number Of Mulank 7 : अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला असतो अशा लोकांचा मूलांक 7 आहे.
Numerology Number Of Mulank 7 : ज्योतिष शास्त्रात, ज्याप्रकारे व्यक्तीच्या राशीनुसार त्यांचा स्वभाव ठरवला जातो. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Numerology) शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि स्वभावातील विविध गुणांचा अंदाज लावता येतो. जन्मतिथीच्या आधारेच व्यक्तीच्या भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळाबाबत माहिती मिळते. प्रत्येक व्यक्तीचा संबंध कोणत्या ना कोणत्या व्यक्तीशी असतो. अंकशास्त्रात 1 ते 9 मूलांक सांगण्यात आले आहेत. जन्माच्या तिथीनुसार, अंकशास्त्रात व्यक्तीच्या करिअर, लव्ह लाईफ, आर्थिक जीवन आणि आरोग्याबाबत माहिती काढता येते. काही लोक असेही आहेत ज्यांचं वैवाहिक जीवन फार तणावपूर्वक असतं. हा मूलांक (Mulank) नेमका कोणता ते जाणून घेऊयात.
मूलांक 7 च्या प्रेम जीवनात येतात संकटं
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला असतो अशा लोकांचा मूलांक 7 आहे. मूलांक 7 वर केतुचा प्रभाव असतो. असं म्हणतात की, या मूलांकाचे लोक आपल्या म्हणण्यावर ठाम असतात. यामुळेच अनेकदा त्यांना समाजात वावरताना किंवा वैवाहिक नात्यात तडजोड करावी लागते. त्यामुळेच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
वैवाहिक जीवनावर 'असा' होतो परिणाम
मूलांक 7 असणाऱ्या लोकांवर केतुचा प्रभाव असतो. यामुळेच त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा परिणाम होतो. अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे देखील गैरसमज वाढतात. असे लोक आपलं म्हणणं मोकळेपणाने मांडू शकत नाहीत. यामुळेच यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण होतो. छोट्या-छोट्या कारणांवरून या लोकांच्या आयुष्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.
'असं' असतं यांचं आयुष्य
मूलांक 7 असणारे लोक फार कमी मैत्री करतात. या लोकांच्या जीवनात सुख-सुविधा असतात. असं म्हणतात की, मूलांक 7 असणारे लोक फार बुद्धिमान असतात. आपल्या मेहनतीने पैसे कमावणं यांना जास्त आवडतं. यामुळेच यांना कधीच आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हे लोक फार सक्षम असतात.
'या' लोकांबरोबर संबंध चांगले असतात
मूलांक 7 असणाऱ्या लोकांची मैत्री मूलांक 5 आणि 6 असणाऱ्या लोकांबरोबर चांगली होते. असं म्हणतात की, हे लोक न्यायाधीश, लेखर, डॉक्टर किंवा ज्योतिषी क्षेत्रात चांगलं कार्य करतात.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)