एक्स्प्लोर

Numerology : आज कृतिका नक्षत्र! मूलांक 1, 3 आणि 6 साठी आजचा दिवस आव्हानात्मक; अंकशास्त्रानुसार 'असा' असेल तुमचा आजचा दिवस

Numerology Today 11 April 2024 : मूलांक 4 असणाऱ्या लोकांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं. आज रात्री 1 वाजून 38 मिनिटांपर्यंत कृत्तिका नक्षत्र असणार आहे.

Numerology Today 11 April 2024 : अंकशास्त्रात (Numerology) देखील एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबाबत अचूक माहिती देता येते. अंकशास्त्रानुसार, आजचा दिवस गुरुवार हा मूलांक 6 असणाऱ्या लोकांसाठी काहीसा घातक असणार आहे. या लोकांनी प्रेम संबंधांच्या बाबतीत सतर्क राहावे. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. तर मूलांक 8 असणाऱ्या लोकांनी थोडीशी सावधानता बाळगावी. मूलांक 4 असणाऱ्या लोकांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं. आज रात्री 1 वाजून 38 मिनिटांपर्यंत कृत्तिका नक्षत्र असणार आहे. तसेच आज आयुष्मान योग बनणार आहे. एकूणच, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

मूलांक 1 : आज आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या 

मूलांक 1 साठी हा काळ महत्त्वाचा असणार आहे. आज कोणतंही काम करताना विचारपूर्वक करा. वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. आज घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. तसेच, इतरांची सेवा करताना तुमच्याही तब्येतीची काळजी घ्या. 

मूलांक 2 : पैशांची गुंतवणूक करू नका 

आज मूलांक 2 साठी दिवस तणावाचा असणार आहे. अशा वेळी कुठेही पैशांची गुंतवणूक करू नका. कारण गुंतणुकीच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे घाईत कोणताही निर्णय घेऊ नक. मनशांतीसाठी भगवान शंकराची आज पूजा करा. 

मूलांक 3 : घरात तणावाचं वातावरण असण्याची शक्यता 

आज तुमच्याकडे इतरांपेक्षा जास्त पैसा असेल पण खर्चही तितकाच असेल. आज दिवसभरात घरचं वातावरण तणावाचं असेल. मनाच्या शांतीसाठी काही काळ धार्मिक अध्याय करा. तुमचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल. तब्येतीची काळजी घ्या. श्वसनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. 

मूलांक 4 : वाणीवर नियंत्रण ठेवा

आज नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. आज कामात तुमचं लक्ष असेल. सकारात्मक विचार आणि एकाग्रता यांचा नीट ताळमेळ जुळेल. आज तुमची  अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील फक्त वाणीवर नियंत्रण ठेवा. 

मूलांक 5 : संयमाने काम करा 

मूलांक 5 असलेल्या लोकांच्या बौद्धिक विकासाचं फार कौतुक होईल. तुमचं प्लॅनिंग आणि वास्तविक परिस्थिती यामध्ये थोडं अंतर असेल त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.जर तुम्ही व्यवसायात असाल, तर नवीन आणि चांगला मार्ग शोधा.काळजीपूर्वक विचार करा आणि पुढे जा. 

मूलांक 6 : प्रेमसंबंधात तणाव वाढेल

6 मूलांक असणाऱ्या लोकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष द्यावं.  आरोग्याची विशेष काळजी घ्या. विशेषत: संसर्गजन्य आजारांपासून दूर राहा.कोणत्याही प्रेमसंबंधांपासून दूर राहा अन्यथा तुमचा मानसिक तणाव वाढेल आणि घरातील समस्याही वाढतील.

7. मुलांकडून भावना दुखावू शकतात  

आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत फारच चिंतेत राहू शकता. तुम्ही मेंदूच्या किंवा पायाच्या समस्येमुळे त्रस्त असू शकता. तुमच्या मुला-मुलीच्या वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

8. आज सावधगिरीने चाला 

8 मूलांक असणाऱ्यांचा आजचा दिवस त्रासदायक आणि तणावपूर्वक असेल.  तुमचे स्वतःचे निर्णय तुम्हाला चुकीचे वाटू शकतात. आज कोणालाही पैसे उधारीवर देऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या.

9. आज रागावर नियंत्रण ठेवा 

आज थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी विद्युत उपकरणांची विशेष काळजी घ्या. तुमची विचारपूर्वक आखलेली योजना अयशस्वी होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही अत्यंत रागात राहाल. यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : 2038 पर्यंत 'या' राशींवर असणार शनिची साडेसाती; एकामागोमाग करावा लागणार संकटांचा सामना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget