Numerology: उशीरा का होईना, पण 'छप्परफाड' यश मिळतं! 'या' जन्मतारखांचं अचानक नशीब पालटतं, शनि, राहू, केतूचं मोठं वर्चस्व, अंकशास्त्र
Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार, काही जन्मतारखा अशा आहेत, ज्यांना उशीरानं यश मिळतं, कारण त्यांच्यावर शनी, राहू आणि केतूचा प्रभाव असतो, ज्यामुळे जीवनात चढ-उतार आणि अचानक बदल होतात.

Numerology: या जगात अनेकजण मेहनत करतात, प्रत्येकाला श्रीमंत व्हायची इच्छा असते, पण कोणाला लवकर यश मिळतं, तर कोणाला उशीरानं यश मिळतं. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर काही जन्मतारखा अशा आहेत, ज्यांना उशीरानं यश मिळतं, कारण त्यांच्यावर शनि, राहू आणि केतूचा प्रभाव असतो, ज्यामुळे जीवनात चढ-उतार आणि अचानक बदल होतात. जाणून घेऊया अशा जन्मतारखांबद्दल, ज्यांना उशीरानं यश मिळतं...
'या' जन्मतारखेच्या लोकांना यश मिळण्यास विलंब होतो...
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचा मूलांक त्यांच्या जीवनाची दिशा, संघर्ष आणि मानसिक स्थिती दर्शवतो. काही अंकांवर शनि, राहू आणि केतूचा प्रभाव असतो, ज्यामुळे जीवनात विलंब, चढ-उतार आणि अचानक बदल होतात.
'या' जन्मतारखांवर शनिचा प्रभाव आणि संघर्षाचा मार्ग
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला असते, त्यांचा मूलांक 8 असतो, हा अंक शनि ग्रहाशी संबंधित मानला जातो. या अंकांच्या लोकांना खूप मेहनत करावी लागते. परिणाम मिळण्यास विलंब होतो. त्यांना वारंवार अडथळे, विलंब आणि जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागतो. शनि हा न्यायाचा ग्रह देखील आहे, त्यामुळे जर या लोकांनी प्रामाणिकपणाने आणि संयमाने काम केले, तर त्यांना अखेरीस यश मिळते, शनिदेवांच्या कृपेने मिळालेले हे यश दीर्घकाळ टिकणारे असते.
'या' जन्मतारखांबाबत राहूचा रहस्यमय खेळ...
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या 4, 13 किंवा 22 तारखेला असते, त्यांचा मूलांक 4 असतो. 4 हा राहूचा अंक मानला जातो. हा अंक अचानक बदल, गोंधळ आणि अस्थिरता दर्शवतो. या अंकाचे लोक अनपेक्षित परिस्थितींना सामोरे जातात आणि जीवनात अनेक चढ-उतार अनुभवतात. राहूचा प्रभाव त्यांना नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता देतो, परंतु घाईने घेतलेले निर्णय हानिकारक देखील ठरू शकतात. अनेक संघर्षानंतर या जन्मतारखांचं भाग्य उजळते, आणि मग सुख-समृद्धी कायमची त्यांच्याकडे नांदते..
'या' जन्मतारखांवर केतूचा मानसिक प्रभाव
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला असते, त्यांचा मूलांक 7 असतो. अंक 7 हा केतू ग्रहाशी संबंधित आहे. हा अंक अध्यात्म, रहस्य आणि आत्मपरीक्षणाचे प्रतीक मानला जातो. असे लोक आतून शांत असतात, परंतु त्यांना मानसिक संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. ते एकटे राहणे पसंत करतात आणि जीवनाचा सखोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा का त्यांचे नशीब चमकले की मग ते मागे वळून पाहत नाहीत. यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतात.
यशाची गुरुकिल्ली..
अंकशास्त्रानुसार, हे अंक कठीण मानले जातात, परंतु योग्य विचार, संयम आणि आत्मविश्वासाने या आव्हानांना संधींमध्ये बदलता येते.
ही वाचा
Kaal Sarp Yog 2026: पुढचे 11 दिवस 'कालसर्प योग' 3 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! 27 एप्रिलपर्यंत श्रीमंतीचे योग, अनेक वर्षांनी पॉवरफुल ग्रहयोग,
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















