Navratri Culture : 26 सप्टेंबरपासून देशात आदीशक्तीचा जागर केला साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर यावेळी नवरात्र उत्साहात साजरी केली जाणार आहे. ज्याबद्दल लोक खूप उत्सुक आहेत. आज महाराष्ट्रातील अशाच काही देवी देवतांच्या मंदिराचे दर्शन करा, जिची भव्यता आणि ओळख पाहून तुम्ही थक्क व्हाल. 


मुंबा देवी मंदिर
1. मुंबा देवी मंदिर हे मुंबईतील भुलेश्वर येथे स्थित आहे, ज्यावरून मुंबई शहर हे नाव पडले. मुंबा देवी ही येथे राहणाऱ्या कोळी समाजाची कुळदेवी आहे. 400 वर्षे जुन्या या मंदिराची मुंबईत ख्याती आहे.


वज्रेश्वरी मंदिर 
2. मुंबईपासून सुमारे 75 किमी अंतरावर असलेले वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर आहे. नवरात्रीच्या दिवसात येथे मोठ्या उत्साहात वज्रेश्वरी देवीचा उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण नऊ दिवस देवीची आराधना करून मोठी जत्रा भरवली जाते.




सप्तशृंगी देवी मंदिर 
3. सप्तशृंगी देवी मंदिर हे नाशिक महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे, नाशिकपासून सुमारे 60 किमी अंतरावर 4800 फूट उंच सप्तशृंग पर्वतावर विराजमान आहे. देवीचे मंदिर वणी नाशिक).. सह्याद्रीच्या सात शिखरांचे प्रदेश म्हणजे सप्तशृंग पर्वतावर स्थित आहे. जिथे एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेला उंच डोंगर, आपल्याला निसर्ग आणि मातृत्वाची ओळख करून देतो.




4. एकवीरा देवी मंदिर
 लोणावळा येथे एकवीरा देवी मंदिर असून आदिमाया एकवीरा देवीची पूजा केली जाते. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील धुळे शहरातील देवपूर उपनगरात विराजमान झालेल्या या स्वयंभू देवीची महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक  भक्तांकडून कुळदेवीच्या रूपात पूजा केली जाते.




5. रेणुका देवी मंदिर
महाराष्ट्रातील माहूर क्षेत्र रेणुका देवी मंदिरासाठी विशेषतः प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराबरोबरच अनसूया मंदिर आणि कालका मंदिर यांसारख्या इतर देवीही आहेत.


 


6. मांढरदेवी काळूबाई मंदिर
देवी काळूबाईचे मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई भागात डोंगरावर 4650 फूट उंचीवर आहे. हे हिंदू धर्मातील अतिशय प्रसिद्ध मंदिर असून दरवर्षी जानेवारी महिन्यात काळूबाई जत्रा भरवली जाते.




 


7. तुळजा भवानी मंदिर
तुळजा भवानी मंदिर हे सोलापूरपासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेले, 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी म्हणून ख्याती आहे.


 


8. महालक्ष्मी मंदिर
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. ते महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूरचे हे महालक्ष्मी देवीचे मंदिर दक्षिणेची काशी म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात नवग्रह, भगवान सूर्य, महिषासुर मर्धिनी, विठ्ठल रखुमाई, भगवान शिव, विष्णू, तुळजा भवानी आदी देवतांचीही पूजा केली जाते.




 


9. चतुर्श्रृंगी मंदिर 
पुणे सेनापती बापट रोडवरील डोंगराच्या कुशीत वसलेले पुण्याचे प्रसिद्ध चतुश्रृंगी मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. तुमच्या महाराष्ट्र सहलीत या देवींच्या मंदिरांना भेट द्या आणि श्रद्धेची भावना अनुभवा.




 


संबंधित बातम्या


Navratri Puja 2022 : नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांचे ध्यान; जाणून घ्या श्लोक, मंत्र आणि पूजा


Navratri Puja 2022 : नवरात्रीत घटस्थापनेचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या