NavPancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध आणि गुरुमुळे बनला नवपंचम राजयोग; 'या' 3 राशींची आर्थिक स्थिती सुधरणार, नशीब उजळणार
Navpancham Rajyog 2024 : गुरु आणि बुध यांच्या संयोगामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार असून करिअरमध्ये देखील प्रगती होणार आहे.
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदल असतात. प्रत्येक ग्रहाचा भ्रमंती काळ वेगवेगळा असतो, त्यानुसार त्याला ग्रह गोचर म्हणतात. जेव्हा एखाद्या राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात, त्यावेळी काही शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. या योगांचा परिणाम संपूर्ण पृथ्वीसोबत मानवी जीवनावर पडतो. आता तब्बल 500 वर्षांनंतर बुध आणि गुरु यांनी ‘नवपंचम राजयोग’ निर्माण केला आहे. या नवपंचम राजयोगाचा शुभ परिणाम मुख्यत्वे 3 राशींच्या लोकांवर होणार आहे, त्यांना नशिबाची साथ मिळून आर्थिक लाभ होणार आहे. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
धनु रास (Sagittarius)
नवपंचम राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्यासाठी वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करण्याचे योग निर्माण होत आहेत. तसंच या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. या काळात विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे चांगल्या ऑफर येतील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या मान-सन्मान, जमीन आणि संपत्तीचा स्वामी बुध सप्तम भावात स्थित आहे. तर करिअर आणि लग्नाचा स्वामी लाभ स्थानात असल्याने नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे हा योग तुमचा आदर आणि मान सन्मान वाढवणार आहे. जानेवारीत तुमच्या नोकरीत आणि व्यवसायात तुमची प्रगती होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. तुमच्या मुलांच्या सर्व समस्या दूर होतील. तुमचं नशीब या काळात चांगलं राहणार आहे.
कन्या रास (Virgo)
नवपंचम राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध याने हा राजयोग निर्माण केला आहे, त्यामुळे तुम्हाला या काळात धन-संपत्ती, सन्मान आणि ऐश्वर्य लाभेल. तुम्हाला तुमच्या प्रत्येत कामात यश गाठता येईल. नोकरदार वर्गाला त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. या काळात समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. जानेवारीचा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: