Moon Transit : 9 जानेवारीपासून 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ; सूर्य, मंगळ आणि चंद्र देणार महालाभ
Moon Transit 2024 : लवकरच चंद्र आपली चाल बदलेल. चंद्राने राशी बदलताच त्रिग्रही योग तयार होईल, याचा काही राशींना चांगला फायदा मिळेल.
![Moon Transit : 9 जानेवारीपासून 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ; सूर्य, मंगळ आणि चंद्र देणार महालाभ Moon Transit 2024 luck of these zodiac signs will work from january 9 sun mars moon provide great benefits Moon Transit : 9 जानेवारीपासून 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ; सूर्य, मंगळ आणि चंद्र देणार महालाभ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/f0cee018372ab5ffe3e17dc6ce2a28641666166370005381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandra Gochar : चंद्राचं काही दिवसांत मार्गक्रमण होणार आहे. 9 जानेवारीला चंद्र देव त्याची चाल बदलेल. इतर ग्रहांच्या तुलनेत, चंद्र देव एका राशीतून दुसऱ्या राशीत खूप वेगाने फिरतो. मंगळवार, 9 जानेवारीला रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी चंद्र धनु राशीत प्रवेश करेल, जिथे सूर्य आणि मंगळ ग्रह आधीच उपस्थित आहेत. धनु राशीत चंद्राचं (Moon) भ्रमण होताच त्रिग्रही योग तयार होईल. चंद्राच्या मार्गक्रमणामुळे तयार झालेला त्रिग्रही योग प्रामुख्याने 5 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे, या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृश्चिक रास (Scorpio)
चंद्राचं मार्गक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं, यामुळे तुम्हाला दिवसभर सकारात्मक वाटेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल, तुमची रखडलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कामानिमित्त एखाद्या ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ रास (Aquarius)
चंद्राच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांना चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. धार्मिक कार्यात तुमचं मन व्यस्त राहील. सकारात्मक ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण असाल. तुम्ही सकारात्मक उर्जेचा योग्य वापर करा, हे करिअरच्या दृष्टीने फलदायी ठरेल. वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यात संतुलन ठेवा.
मीन रास (Pisces)
धनु राशीत चंद्राच्या प्रवेशामुळे मीन राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते. तुमचे तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद हळूहळू दूर होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी चंद्राच्या मार्गक्रमणामुळे हा काळ अतिशय शुभ राहील. मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कामात यश मिळेल. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला मिळेल. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक लाभाची शक्यता निर्माण करत आहे. यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठीही हा काळ चांगला राहील. चंद्राच्या मार्गक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. या काळात तुम्हाला एखादा प्रवास करावा लागू शकतो, तुम्ही नवीन ठिकाणी सहलीला जाऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Mahashivratri 2024 Date : नवीन वर्षात महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)