एक्स्प्लोर

Mohini Ekadashi 2022 : उद्या भगवान विष्णूची प्रिय मोहिनी एकादशी, जाणून घ्या व्रत, शुभ मुहूर्त, महत्त्वाच्या गोष्टी

Mohini Ekadashi 2022 : अशी मान्यता आहे की, या दिवशी प्रामाणिकपणे तसेच निष्ठेने केलेल्या या व्रताचा पूर्ण लाभ मिळतो. 12 मे 2022 रोजी म्हणजेच उद्या मोहिनी एकादशी आहे.

Mohini Ekadashi 2022 : वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विशेष धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूला अधिक प्रिय आहे. पौराणिक मान्यतेनुसार एकादशीला देवीने मुर नावाच्या राक्षसाचा वध केला. अशी मान्यता आहे की, या दिवशी प्रामाणिकपणे तसेच निष्ठेने केलेल्या या व्रताचा पूर्ण लाभ मिळतो. 12 मे 2022 रोजी म्हणजेच उद्या मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi 2022) आहे. जाणून घेऊ महत्वाच्या गोष्टी

अत्यंत शुभ आणि फलदायी एकादशी
गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. ही एकादशी येते अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. मोहिनी एकादशीची (Mohini Ekadashi 2022) तिथी 11 मे रोजी सायंकाळी 7.31 वाजता सुरू होईल, तर 12 मे रोजी सायंकाळी 6.51 वाजता समाप्त होईल. मोहिनी एकादशी 2022 विशेष मानली जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी शनि आणि गुरु आपापल्या राशीत विराजमान असतील. शनि कुंभ राशीत आणि गुरू मीन राशीत भ्रमण करेल. 

शुभ मुहूर्त
मान्यतेनुसार, मोहिनी एकादशीचा (Mohini Ekadashi 2022) उपवास द्वादशी तिथीला केला जातो. 13 मे रोजी मोहिनी एकादशीचे व्रत (Mohini Ekadashi Fast) सोडता येणार आहे. मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi 2022) व्रत पूर्ण करण्याचा शुभ मुहूर्त 13मे 2022 रोजी सकाळी 7:59 पर्यंत असेल.

मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi 2022) व्रताची उपासना पद्धत 

या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर, पाटावर पिवळे आसन घालून भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करा. यासोबतच लक्ष्मीची मूर्तीही ठेवावी. पुजेसाठी फुले, फळे, नैवेद्य, धूप, दीप, अगरबत्ती लावून श्री हरिनारायण आणि माता लक्ष्मीची पूजा करा. पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून पूजा केल्यानंतर देवाची आरती करा, या दिवशी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा. याने श्री हरिनारायण आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात.

व्रतामध्ये घ्या विशेष गोष्टींची काळजी
एकादशीच्या व्रतामध्ये काही विशेष गोष्टींची काळजी घेतली जाते. या दिवशी भात खाऊ नये. तुळशीची पाने तोडू नयेत. केस आणि नखे अजिबात कापू नका. भगवंताचे स्मरण करावे. पुण्यकर्मे करावीत.

धर्मशास्त्रात मोहिनी एकादशीचे मोठे पुण्य 

सर्व एकादशी एका बाजूला आणि मोहिनी एकादशी एका बाजूला, एवढे मोठे पुण्य मोहिनी एकादशीचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. प्रभू रामचंद्रांनी एकदा वसिष्ठ ऋषींना सीतेच्या विरहानंतर व्याकुळ होऊन मनाच्या शांती आणि समाधानासाठी एखादे व्रत सांगण्याची विनंती केल्यावर वसिष्ठ ऋषींनी रामाला ही मोहिनी एकादशी करण्यास सांगितले होते. देवाने समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेले मोहिनीचे रूप याच दिवशी घेऊन अमृताचे वाटप केल्याची मान्यताही असल्याने या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने संबोधले जाते. अंतःकरणातील सर्व विषारी मोह माया यांची बंधने तोडणारी अशी ही मोहिनी एकादशी असते. 

पंढरीची वारी आहे माझे घरी !
आणिक न करी तीर्थव्रत !!  

पंढरीची वारी करीत विठूरायाची उपासना

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे भागवत संप्रदायातील लाखो वारकरी केवळ पंढरीची वारी करीत विठूरायाची उपासना आणि एकादशी करीत असतात. मोहिनी एकादशीस येणाऱ्या द्वादशीला देखील वारकरी संप्रदायात खूप मोठे महत्व असते. याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो. एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन पुन्हा लोकसभेला सक्सेस होणार?
न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन लोकसभेला सक्सेस होणार?
ट्रकचालकाने बाईकस्वारास फरफटत नेले, अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सना गडकरींची आठवण
ट्रकचालकाने बाईकस्वारास फरफटत नेले, अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सना गडकरींची आठवण
Pallavi Dempo : आलीशान गाड्या ते थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यातील सर्वात गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यात भाजपच्या गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
Abhijit Bichukale on Udayanraje Bhosale : अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Suresh Navale : नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडली - सुरेश नवलेAmit Shah Ratnagiri : रत्नागिरीत अमित शाहांच्या सभेसाठी मैदान निश्चितChandrakant Patil : 33 महिने आम्ही काय सहन केलं आमचं आम्हाला माहिती - चंद्रकांत पाटीलRavindra Dhangekar : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी धंगेकरांचं पुण्यात शक्तीप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन पुन्हा लोकसभेला सक्सेस होणार?
न्यायाची हमी दिलेल्या काँग्रेसचा सर्वात मोठा डाव; 'बीस साल बाद' प्लॅन लोकसभेला सक्सेस होणार?
ट्रकचालकाने बाईकस्वारास फरफटत नेले, अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सना गडकरींची आठवण
ट्रकचालकाने बाईकस्वारास फरफटत नेले, अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सना गडकरींची आठवण
Pallavi Dempo : आलीशान गाड्या ते थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यातील सर्वात गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
थेट दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; गोव्यात भाजपच्या गर्भश्रीमंत उमेदवाराची संपत्ती किती हजार कोटी?
Abhijit Bichukale on Udayanraje Bhosale : अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
अभिजित बिचकुलेंनी सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उदयनराजेंना दिल्ला सल्ला!
Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput Death : तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?
तो एक आऊटसाइडर होता, त्याचा मृत्यू झाला तेव्हा...;सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर दिबाकर बॅनर्जीने काय म्हटले?
Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Embed widget