Angarak Yog : मंगळ आणि राहुच्या युतीमुळे बनतोय अशुभ अंगारक योग; 'या' राशींनी राहावं सांभाळून, बसणार आर्थिक फटका
Angarak Yog In Meen : मंगळ आणि राहुच्या युतीमुळे बनणारा अंगारक योग काही राशींसाठी डोकेदुखी ठरणार आहे. या अशुभ योगामुळे काही राशींच्या लोकांना जीवनात विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊया.
Angarak Yog In Meen : ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो. अशा स्थितीत दोन ग्रहांच्या संयोगाने अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. असाच एक योग 23 एप्रिलला निर्माण होणार आहे, ज्याला अंगारक योग म्हणतात. मंगळ आणि राहूच्या संयोगाने हा योग तयार होतो. अंगारक योग हा सर्वात अशुभ योगांपैकी एक मानला जातो.
ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी राहु मीन राशीत असून तो वर्षभर या राशीत (Zodiac Signs) राहणार आहे. यासोबतच 23 एप्रिल 2024 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ देखील मीन राशीत प्रवेश करेल. जिथे तो 31 मे पर्यंत राहणार आहे. मंगळ आणि राहूच्या संयोगाने अंगारक योग तयार होईल, जो 31 मे पर्यंत राहणार आहे.
अंगारक योग किती अशुभ?
अंगारक योगाच्या निर्मितीमुळे व्यक्तीला अनेक समस्या आणि आव्हानांना तोंड द्यावं लागतं, कारण मंगळ हा अग्नि तत्व असलेला क्रूर ग्रह मानला जातो. यासोबतच राहुला अशुभ ग्रह म्हटलं जातं. या दोन्हींच्या संयोगाने तयार झालेला अंगारक योग अंगारासारखा परिणाम देतो. या योगाच्या निर्मितीमुळे व्यक्तीच्या स्वभावात बरेच बदल होतात. त्याच्या आत आणखी राग भरतो. शत्रू वरचढ होतात.
अंगारक योगादरम्यान या' राशींनी राहावं सांभाळून
मेष रास (Aries)
मेष राशीच्या बाराव्या घरात अंगारक योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. यासोबतच तुमचे विचार सतत बदलू शकतात. शिक्षण, आरोग्य किंवा कौटुंबिक कारणांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्येही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या छोट्या कामासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. यासोबतच प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबतही थोडं सावध राहण्याची गरज आहे. यासोबतच तुम्हाला कामानिमित्त जास्त प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळे तुम्ही कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही.
कन्या रास (Virgo)
या राशीच्या सातव्या घरात अंगारक योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. मित्रांमुळे काही समस्यांना सामोरं जावं लागेल. यासोबतच जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक समस्या उद्भवू शकतात. तुमचा अहंकार झपाट्याने वाढू शकतो, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात. पतीपत्नीच्या नात्यात विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या चौथ्या घरात अंगारक योग तयार होत आहे. अशा स्थितीत राहू या राशीच्या लोकांच्या सुखसोयी आणि ऐषोआराम कमी करेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आरोग्याबाबत थोडंही बेफिकीर राहू नका. घरगुती जीवनातही काही बदल दिसून येतील. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो, कारण तुमच्या कामात कोणी ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही. यासोबतच कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: