Mangal Grah Upay : पुढचे 2 महिने असणार मंगळ ग्रहाचं सावट; 12 राशींनुसार आत्ताच सुरु करा 'हे' उपाय, अन्यथा...
Mangal Grah Upay : मंगळ ग्रहाने सिंह राशीत संक्रमण केलं आहे. 28 जुलै रोजी रात्री 8 वाजून 11 मिनिटांपर्यंत मंगळ ग्रह सिंह राशीत असणार आहे.

Mangal Grah Upay : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ (Mangal Gochar) ग्रहाचं राशी परिवर्तन आज म्हणजेच 7 जून रोजी झालं आहे. मंगळ ग्रहाने सिंह राशीत संक्रमण केलं आहे. 28 जुलै रोजी रात्री 8 वाजून 11 मिनिटांपर्यंत मंगळ ग्रह सिंह राशीत असणार आहे. मंगळ ग्रहाचं हे राशी परिवर्तन पुढचे 2 महिने फार त्रासदायक ठरेल. मंगळ ग्रहाच्या कारणाने तणाव, दुर्घटना, आग, वादविवादाची स्थिती वाढू शकते. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे राशीनुसार हे उपाय जाणून घ्या.
राशीनुसार मंगळ ग्रहाचा उपाय
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांनी रोज हनुमान चालीसाचं पठण करणं गरजेचं आहे. त्यानंतर गूळ आणि चणे दान करा. यामुळे तुमचं रागावर नियंत्रण राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीच्या लोकांनी मंगळवारी मसूर डाळ आणि लाल कपडे दान करा. मंगळ ग्रहाच्या प्रभावाने कुटुंबात सामंजस्य वाढेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी लाल फुलाने भगवान हनुमानाची पूजा करा. तसेच, तांब्याच्या भांड्याचं दान करा.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगावर जल अर्पण करावे. तसेच, लाल चंदनाचा लेप लावावा.
सिंह रास (Leo Horoscope)
मंगळ ग्रहाच्या शुभ प्रभावासाठी सिंह राशीने मंगळाच्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर लाल मसूर दान करावे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांनी भगवान शंकराचा अभिषेक करणं गरजेचं आहे. तसेच, मंगळवारच्या दिवशी हनुमानाची विधीवत पूजा करावी.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी मंगळ ग्रह स्थिर करण्यासाठी रक्तदान करणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात संतुलन राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीच्या लोकांनी कमीत कमी 5 मंगळवारपर्यंत गूळ आणि तांब्याचं दान करावं. यामुळे अनेक दुर्घटना टळतील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
मंगळ ग्रहाच्या उपायाने तुम्ही मंदिरात लाल रंगाचं फूल चढवू शकता. आणि रुद्राभिषेक करु शकता.
मकर रास (Capricorn Horoscope)
या राशीच्या लोकांनी लाल चंदनाचा टिळा लावावा आणि मंगळ मंत्राचा जप करावा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
मंगळवारच्या दिवशी लाल मिरची आणि मसूर डाळ दान करणं उत्तम ठरेल.
मीन रास (Pisces Horoscope)
या राशीने भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान हनुमानाचं दर्शन घ्यावं. त्यानंतर रक्तदान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















