Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती 13, 14 जानेवारीलाच का येते? वाचा मकर संक्रांतीबाबतचं धक्कादायक वैज्ञानिक सत्य
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांत मात्र दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच साजरी केली जाते. या मागचं कारण नेमकं तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Makar Sankranti 2026 : हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे भारतात अनेक प्रकारचे सण-समारंभ साजरे केले जातात. या सणांची तारीख प्रत्येक वर्षाला बदलत असते. तसेच, काहीशा फरकाने मागे-पुढे होते. पण, मकर संक्रांत (Makar Sankranti 2026) मात्र दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच साजरी केली जाते. या मागचं कारण नेमकं तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
इतर सणांप्रमाणे मकर संक्रांतीची तारीख का बदलत नाही. याचं उत्तर भारतीय ज्योतिष, खगोल वैज्ञानिक, आणि आपल्या प्राचीन संस्कृतींमध्ये आहे. खरंतर, भारतातील अनेक सण हे चंद्र पंचांगावर आधारित आहेत जस की, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, ताईच दिवाळी, होळी हे सण चंद्र पंचांगावर आधारित असतात.
मकर संक्रांती म्हणजे काय?
संक्रांती म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो क्षण. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते.
हिंदू पंचांगातील दोन प्रकार
हिंदू पंचांग मुख्यतः दोन प्रकारचे असतात:
1. चंद्र पंचांग
तिथी, महिने चंद्रावर आधारित
दिवाळी, होळी, गुढीपाडवा यांसारखे सण बदलत्या तारखांना येतात
2. सौर पंचांग
सूर्याच्या गतीवर आधारित
मकर संक्रांती, वैशाखी, पोंगल हे सण सूर्यावर आधारित आहेत
सूर्याची गती आणि पृथ्वीचे भ्रमण
पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी सुमारे 365 दिवस 5 तास 48 मिनिटे इतक्या वेळेत पूर्ण करते. त्यामुळे सूर्याची राशी बदलण्याची वेळ दरवर्षी फारशी बदलत नाही. म्हणूनच सूर्याचा मकर राशीत प्रवेश साधारण 13 किंवा 14 जानेवारीला होतो.
मकर संक्रांतीचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
या दिवसापासून सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरु होतो. दिवस मोठे होऊ लागतात, थंडी कमी होऊ लागते. शेतीसाठी आणि निसर्गचक्रासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















