Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला 1, 2 नाही तर तब्बल 4 ग्रहांचं बॅक टू बॅक संक्रमण; वर्षाच्या सुरुवातीलाच 'या' राशींची होणार छप्परफाड कमाई
Makar Sankranti 2026 : द्रिक पंचांगानुसार, 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीला सूर्य धनुमधून मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा मकर संक्रांतीला एक दुर्मिळ संयोग जुळून येणार आहे.

Makar Sankranti 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) पहिला सण साजरा केला जाणार आहे.या दिवशी सूर्याचं उत्तरायण होतं. म्हणजेच सूर्यदेवाची दिशा उत्तरच्या दिशेने होते. यंदा मकर संक्रांतीला एक दुर्मिळ संयोग जुळून येणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीला सूर्य धनुमधून मकर राशीत संक्रमण करणार आहे. याच्या एक दिवसाआधी म्हणजेच 13 जानेवारी रोजी शुक्रसुद्धा मकर राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 16 जानेवारीला मंगळ ग्रह आणि 17 जानेवारीला बुध ग्रहसुद्धा मकर राशीत संक्रमण करणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभ दिनी ग्रहांच्या या संक्रमणाने तीन राशींसाठी शुभ काळ ठरणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचं लागोपाठ होणारं संक्रमण मेष राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या कालावधीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील ऐकायला मिळेल. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
या काळात कर्क राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. या कालावधीत तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. तसेच, धनसंपत्तीचे चांगले योग जुळून येणार आहेत. परदेशात जाण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते. उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीचा काळ फार सुखद असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. पार्टनरबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. गैरसमज दूर होतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. सरकारी योजनांचा लाभ घ्याल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Horoscope Today 31 December 2025 : आज 31 डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या दिवशी 'या' 5 राशींना लागणार संकटाची चाहूल; दिवसभरात फक्त 'हे' कार्य टाळा, आजचे राशीभविष्य



















