Makar Sankranti 2025 : 14 की 15 जानेवारी? मकर संक्रांतीचा सण नेमका कधी साजरा करायचा? वाचा शुभ मुहूर्त
Makar Sankranti 2025 : हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे, जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.
Makar Sankranti 2025 : नवीन वर्ष 2025 ची सुरुवात अतिशय आनंदात झाली आहे. आपण सर्वांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे. नवीन वर्षात (New Year) येणारा पहिलाच आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti). मात्र, यंदाची संक्रांती नेमकी 14 जानेवारीला की 15 जानेवारीला? या संदर्भात मनात संभ्रम निर्माण होतो. या निमित्ताने संक्रांतीची अचूक तारीख, पूजा मुहूर्त आणि महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.
मकर संक्रांती नेमकी कधी आहे?
हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे, जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला नसून 14 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आहे. सूर्याचं संक्रमण 14 जानेवारी रोजी सकाळी 09 वाजून 03 मिनिटांनी मकर राशीत होणार आहे.14 जानेवारीला मकर संक्रांत देशभरात साजरी करणं शास्त्रानुसार शुभ मानलं जाणार आहे.
मकर संक्रांती 2025 शुभ मुहूर्त कधी? (Makar Sankranti Shubh Muhurta 2025)
14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 09:03 ते 05:46 पर्यंत आहे. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी 09:03 ते 10:48 पर्यंत आहे. महा पुण्यकाल 1 तास 45 मिनिटांपर्यंत आहे, तर पुण्यकाळ 8 तास 42 मिनिटांपर्यंत आहे.
मकर संक्रांतीला स्नान आणि दान केव्हा करावे?
14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या पवित्र कालावधीत स्नान आणि दान चालू राहील. तुम्हाला हवे असल्यास महापुण्यकाळात सकाळी 09:03 ते 10:48 या वेळेत स्नान करून दान करावे. हा काळ खूप चांगला मानला जातो.
मकर संक्रांती 2025 चा शुभ मुहूर्त...
- ब्रह्म मुहूर्त : सकाळी 05:27 ते 06:21 पर्यंत
- दिवसभरातील मुहूर्त : 05:54 AM ते 07:15 पर्यंत
- अभिजीत मुहूर्त : दुपारी 12:09 ते 12:51 पर्यंत
- विजय मुहूर्त : दुपारी 02:15 ते 02:57 पर्यंत
- निशिता मुहूर्त : रात्री 12:03 ते 12:57 पर्यंत असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :