Mahashivratri 2022 Live Updates : राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, भाविकांची शिवमंदिरात गर्दी

Maha Shivaratri 2022 : राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने अनेक शिवमंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Mar 2022 11:07 AM

पार्श्वभूमी

Maha Shivaratri 2022 : आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस.  माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. कोरोनाची लाट ओसरल्याने अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले...More

Mahashivratri 2022 : वेळापूर येथील पुरातन अर्धनारी नटेश्वर मंदिरात शिवरात्रीचा महाजागर
Mahashivratri 2022 : महाशिवरात्री निमित्त देशभर आणि जगभरात आज शंभू महादेवाचा उत्सव साजरा होत असताना वेळापूर येथील पुरातन अशा अर्धनारी नटेश्वर मंदिरात देखील आज हजारो भाविक येथील महादेवाच्या खास रूपाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत . पांडवकालीन असलेल्या या पुरातन मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारी महादेवाची अनोखी पिंडी आहे . या पुरातन मंदिरात पाच हजार वर्षांपूर्वीची महादेवाची पिंडी असून येथे पिंडीच्या ठिकाणी दागिन्याने नटविलेले अर्धनारी नटेश्वर आहेत . म्हणजेच अर्धे शंकर आणि अर्धी पार्वती यांच्या मूर्ती पिंडीच्या ठिकाणी पाहायला मिळतात . अशा पद्धतीची मूर्ती जगात इतरत्र कोठेही आढळत नसल्याने या मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे