एक्स्प्लोर

Mahashivratri 2022 Live Updates : राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, भाविकांची शिवमंदिरात गर्दी

Maha Shivaratri 2022 : राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने अनेक शिवमंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे.

LIVE

Key Events
Mahashivratri 2022 Live Updates : राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, भाविकांची शिवमंदिरात गर्दी

Background

Maha Shivaratri 2022 : आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस.  माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. कोरोनाची लाट ओसरल्याने अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांची शिवमंदिरात गर्दी उसळली आहे. राज्यातील ज्योतीर्लिंग मंदिरासह प्रसिद्ध शिवमंदिरात भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. 

व्रत पद्धत आणि विधी

महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे.  बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी.  शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

14:03 PM (IST)  •  01 Mar 2022

Mahashivratri 2022 : वेळापूर येथील पुरातन अर्धनारी नटेश्वर मंदिरात शिवरात्रीचा महाजागर

Mahashivratri 2022 : महाशिवरात्री निमित्त देशभर आणि जगभरात आज शंभू महादेवाचा उत्सव साजरा होत असताना वेळापूर येथील पुरातन अशा अर्धनारी नटेश्वर मंदिरात देखील आज हजारो भाविक येथील महादेवाच्या खास रूपाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत . पांडवकालीन असलेल्या या पुरातन मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारी महादेवाची अनोखी पिंडी आहे . या पुरातन मंदिरात पाच हजार वर्षांपूर्वीची महादेवाची पिंडी असून येथे पिंडीच्या ठिकाणी दागिन्याने नटविलेले अर्धनारी नटेश्वर आहेत . म्हणजेच अर्धे शंकर आणि अर्धी पार्वती यांच्या मूर्ती पिंडीच्या ठिकाणी पाहायला मिळतात . अशा पद्धतीची मूर्ती जगात इतरत्र कोठेही आढळत नसल्याने या मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे 

11:16 AM (IST)  •  01 Mar 2022

Mahashivratri 2022 : भीमाशंकर येथे गृहमंत्र्यांच्या हस्ते महाआरती संपन्न

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत सगळी मंदिरही बंद ठेवावी लागली होती. आता हा विळखा सुटत असताना महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक शंभू महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करत आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मंदिरामध्ये राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील दर्शना साठी पोहोचले.. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शंभू महाराजांची महाआरती संपन्न झालेली यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते...

11:13 AM (IST)  •  01 Mar 2022

Mahashivratri 2022 : परळीतील वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी, यात्रा मोहत्सवावर बंदी

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सज्ज झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी वैद्यनाथ मंदिराची यात्रा रद्द करण्यात आलीय. केवळ दर्शनासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आलंय. तर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिरात प्रभू वैद्यनाथाची महापूजा पार पडणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आलीय..

11:02 AM (IST)  •  01 Mar 2022

Mahashivratri 2022 : नाशिकच्या त्र्यंबकेशवर मंदिरात भाविकांची गर्दी

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्तानं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेशवर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनामुळे गेले दोन वर्ष महाशिवरात्रीला महादेवाचं दर्शन घडू शकलं नव्हतं. मात्र आता कोरोना मागे सारून भाविकांनी शिवमंदिरात गर्दी करायला सुरुवात केली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Embed widget