(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maghi Ganesh Jayanti: माघी गणेश जयंती कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, पूजा पद्धत
Maghi Ganesh Jayanti: माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारीला आहे. तर 12 फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो
Maghi Ganesh Jayanti : हिंदू (Hindu)धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे . पुराणात माघ (Magh) महिना मोक्षाचा महिना मानला गेला आहे. तसेच फेब्रुवारी महिना खास आहे . कारण 13 फेब्रुवारीला गणेश जयंती आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे गणेश जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. गणेशोत्सवाप्रमाणे माघ महिन्यात दीड दिवसासाठी बाप्पा घरी विराजमान होतात. त्यामुळे गणेशभक्तांना आता 13 फेब्रवारीची आतुरता आहे.
माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारीला आहे. तर 12 फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो. मोदकामध्ये तिळ आणि गुळाचा अधिक वापर करण्यात येतो. काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद किंवा कुंकवाचा वापर करत मूर्ती बनवण्यात येते. या दिवशी गणपचीला लाल वस्त्र, लाल फुल, लाल चंदन आणि लाल मिठाई अर्पण करण्यात येते. हिंदू धर्माक कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपीची पुजा केली जाते. गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात. गणेश जंयतीच्या दिवशी चंद्रद्रर्शन करू नये.
गणेश जयंती 2024 रोजी पूजेसाठी शुभ मुहूर्त
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी 13 फेब्रुवारीला आहे. 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल तर 13 फेब्रुवारी दुपारी दोन वाजून41 मिनिटानी संपणार आहे. सकाळी 11.29 ते दुपारी 1.42 ला समाप्त होणार आहे.
गणेश जयंती पूजा विधी
-गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे लाल वस्त्र परिधान करून गणपतीसमोर उपवासाचे व्रत करावे.
-ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवा त्यवर कलश स्थापित करा.
-आता गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावे.
-गौरीपुत्र गणेशाला कुंकू, हळद, शेंदूर, अक्षता, चंदन, अबीर, गुलाल, अष्टगंध, मेहंदी, लाल फूल, लवंग, वेलची, अत्तर, सुपारी, कापड, नारळ अर्पण करा.
-'श्री गणेशाय नमः दुर्वाकुरान समर्पयामि।. मंत्राचा उच्चार करताना 11 किंवा 21 दुर्वा जोडून अर्पण करा.
प्रसादात तुळस ठेवू नये याची काळजी घ्या, गणपतीच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य आहे
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :