Lucky Zodiac Signs : 24 ऑक्टोबर दिवसाच्या सुरुवातीलाच 5 राशींचं नशीब बदलणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
Lucky Zodiac Signs On 24 October 2025 : उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.

Lucky Zodiac Signs On 24 October 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या 24 ऑक्टोबरचा दिवस आहे. हा दिवस दत्तगुरुंना (Dattaguru) समर्पित आहे. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार आत्मविश्वासाचा असणार आहे. तुमच्यातील ऊर्जा सळसळून वाहेल. तसेच, तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली राहील. उत्पन्नाचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही. तुमची लव्ह लाईफ चांगली राहील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना उद्याच्या दिवसात नशिबाची चांगली साथ लाभेल. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला पू्र्ण करता येतील. एखादी चांगली डील तुमच्या हाताला लागू शकते. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी उद्याचा दिवस वृद्धीचा असेल. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. पैशांच्या बाबतीत व्यवहार करताना सावध राहा. कोणालाही शहानिशा केल्याशिवाय पैसे देऊ नरा. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. आर्थिक बाबतीत तुमच्या संपत्तीत चांगली भरभराट दिसून येईल. तसेच, समाजात तुमची चांगली प्रगती होईल. समाजातील प्रतिष्ठीत लोकांबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. वैवाहिक जीवन सुखी असेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी उद्याचा दिवस फार समृद्धशाली असणार आहे. तुम्ही जर नवीन काम करण्याचे योजिले असेल तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कार्याचा विस्तार झालेला दिसेल. तुमचं बॅंक बॅलेन्स पूर्वीपेक्षा चांगलं असेल. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















