Lucky Zodiac Signs: 30 ऑगस्ट तारीख अद्भूत! 'या' 5 राशींच्या आयुष्यात होणार पैशांची उधळण, बुध सप्टेंबरमध्ये करणार मालामाल...
Lucky Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध संक्रमण होताच, अगदी सप्टेंबरपर्यंत 5 राशींना पैसा, करिअर, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात खूप फायदा होईल.

Lucky Zodiac Signs: तसं पाहायला गेलं तर येणारा प्रत्येक दिवस हा खास असतो. हा दिवस एक नवा उत्साह, आशा घेऊन येतो. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेल्यास तुमच्या कुंडलीत जर ग्रह-ताऱ्यांची स्थिती अनुकूल असेल. तर तुमच्या जीवनात कशाचीही कमी पडत नाही. ऑगस्ट महिन्यातील 30 तारीख अत्यंत खास आहे, कारण या दिवशी ग्रहांचा राजकुमार म्हटला जाणारा बुध ग्रह हा राशी बदलून सूर्याच्या सिंह राशीत येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध संक्रमण होताच, अनेक राशींना पैसा, करिअर, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात खूप फायदा होईल.
सप्टेंबरपर्यंत बुध अनेक राशींना शुभ परिणाम देत राहील..
ज्योतिषशास्त्रानुसार, 30 ऑगस्ट 2025 रोजी, बुध सिंह राशीत येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीत बुधाची स्थिती चांगली मानली जाते. म्हणूनच, सूर्याच्या राशीत सिंह राशीत येण्याने, बुध अनेक राशींच्या जीवनात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी वाढवेल. 30 ऑगस्टला बुध दुपारी 04:45 वाजता राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करेल. 14 सप्टेंबरपर्यंत बुध या राशीत राहील. म्हणजेच, 14 सप्टेंबरपर्यंत बुध अनेक राशींना शुभ परिणाम देत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींबद्दल जाणून घेऊया.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध कर्क राशीच्या लोकांना आर्थिक बळ देईल. यासोबतच तुमच्या संवाद आणि भाषण कौशल्यातही परिपक्वता येईल. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असली तरी तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे लागतील.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या संक्रमणानंतर तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल. हा काळ तुमच्या व्यवसाय आणि नोकरीसाठीही चांगला राहील. तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवीन संधी देखील मिळतील.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध तूळ राशीला शुभ परिणाम देईल. या काळात तुम्ही केलेले काम पूर्ण होईल. आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा मजबूत होईल. सहकाऱ्यांच्या मदतीने करिअर क्षेत्रातही तुमचे काम पूर्ण होईल.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीत बुध ग्रहाचे आगमन कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल. या काळात प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनातील चालू समस्या आणि तणाव कमी होतील.
हेही वाचा :
Weekly Horoscope: सप्टेंबरचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी लकी! तुमच्यासाठी कसा जाणार? मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















