Lucky Gemstone : प्रचंड कष्ट करूनही अनेक वेळा यश मिळत नाही. काही वेळा कुंडलीतील ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे असे घडते. यामुळे त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रत्न शास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्याचे काम काही विशेष रत्ने करतात. त्यांच्या प्रभावामुळे कुंडलीतील दोषही संपतात. चला जाणून घेऊया या खास रत्नांबद्दल.
जेड स्टोन
रत्न शास्त्रामध्ये जेड स्टोनचे वर्णन स्वप्नातील दगड असे केले आहे. ज्यामुळे लाभदायक परिस्थिती निर्माण होते. असे म्हटले जाते की, हे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत होते. हे रत्न धारण केल्याने कामात एकाग्रता वाढते. याशिवाय बुद्धीचाही विकास होतो. जेड स्टोन हा पन्ना रत्नाचा उप-रत्न मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार जो कोणी हे रत्न धारण करतो त्याची निर्णयक्षमता वाढते आणि उत्पन्नाचे साधन वाढते.
टायगर रत्न
रत्न शास्त्रानुसार, टायगर रत्नाचा सर्वात जलद आणि सकारात्मक प्रभाव सर्व रत्नांमध्ये दिसून येतो. हे रत्न धारण करणारी व्यक्तीला यश लवकर मिळते. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीची इच्छाशक्ती वाढते आणि कठीण प्रसंगीही तो योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार टागर रत्न धारण केल्याने व्यक्तीचे रखडलेले काम पूर्ण होते. ते परिधान करणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या