Sunday Upay Astrology : हिंदू धर्मात (Hindu) प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. सूर्यदेवाची (Surya Dev) उपासना करण्यासाठी रविवार (Sunday) हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्यदेवाची कृपा असेल तर माणसाची आयुष्यात खूप प्रगती होते आणि त्याचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. कुंडलीतील बलवान सूर्य जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती घेऊन येतो.


जर सूर्य कमजोर असेल तर..
जर सूर्य कमजोर असेल तर व्यक्ती नेहमी आजारी राहतो, धनाची हानी होते आणि कामेही बिघडू लागतात. रविवारी काही खास उपाय आणि युक्त्या केल्याने धन आणि जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात. रविवारी करावयाच्या या उपायांबद्दल जाणून घेऊया.


-जर तुम्ही रविवारी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल तर एखादे सोपे काम तुमच्या यशाचे दरवाजे उघडू शकते. घरातून बाहेर पडण्यापूर्वी गायीला भाकरी खाऊ घालून निघावे. असे केल्याने आज ज्या कामासाठी तुम्ही घर सोडत आहात ते काम नक्कीच पूर्ण होईल.


-रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गायीच्या तुपाचा दिवा लावा. असे मानले जाते की यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते. ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी शिव मंदिरात देवी गौरी आणि भगवान शंकराला रुद्राक्ष अर्पण करावे. यामुळे संपत्तीचा आशीर्वाद मिळतो.


-जीवनात प्रगती करायची असेल तर रविवारी हे खास उपाय करा. या दिवशी दूध आणि गूळ मिसळून भात खाल्ल्यास विशेष फायदा होतो. याशिवाय लाल कपड्यात बांधून गहू आणि गूळ दान केल्यानेही फायदा होतो.


-कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर या दिवशी केलेल्या उपायांनी बलवान बनता येते. रविवारी पाण्यात गूळ आणि तांदूळ मिसळून पाण्यात टाकावे. असे केल्याने कुंडलीत सूर्याचे स्थान उच्च होते आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.


-घरात सुख-समृद्धी आणायची असेल तर रविवारी आदित्य स्तोत्राचे पठण करा. याच्या पठणाने सूर्यदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.रविवारी कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यापूर्वी गोड पाणी प्यावे.


-रविवारी तुमची इच्छा एका मोठ्या पानात लिहून वाहत्या पाण्यात वाहून द्या. असे केल्याने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :


Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या


Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ