Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त कार्यक्रम आहे. पण तरीही या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. 'बिग बॉस मराठी'चे तिन्ही पर्व सुपरहिट ठरल्यानंतर प्रेक्षक चौथ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. पण आता चौथ्या पर्वाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. महेश मांजरेकरांनी प्रोमो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


प्रोमोमध्ये मांजरेकर म्हणत आहेत,"होस्ट जरी असलो ना तरी अनेक भूमिका कराव्या लागतात. कधी पोस्टमन बनून माय बाप प्रेक्षकांच्या सूचना स्पर्धकांपर्यंत पोहोचवाव्या लागतात. तर कधी खेळाचा गुंता सोडवणारा तटस्थ हंपायर. कधी शाळेतला कडक मास्तर. कुटुंबप्रमुख म्हटल्यावर जरा शिस्त आणि शांती जपावीच लागणार. तरचं घराचं घरपण टिकतं... 'बिग बॉस मराठी' 'यंदा ऑल इज वेल'. 






प्रोमो शेअर करत मांजरेकरांनी लिहिलं आहे,"100 दिवसांचा हा खेळ...कधी पास कधी फेल... पण महेश मांजरेकरांच्या मते यंदा ऑल इज वेल... पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा ग्रॅंड प्रीमिअर 2 ऑक्टोबरला संध्या. 7 वा, सोम-शुक्र रात्री 9.30 वाजता फक्त कलर्स मराठीवर! बिग बॉस मराठीचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा ग्रॅंड प्रीमिअर 2 ऑक्टोबरला होणार आहे. तर 2 ऑक्टोबरपासून सोम-शुक्रवार रात्री 10 वा. आणि रविवारी रात्री 9.30 वा प्रेक्षकांना हा बहुचर्चित कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट; मांजरेकरांनी सांगितले राग शांत करण्याचे 101 उपाय


Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीची रिलीज डेट जाहीर? महेश मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो