Kojagiri Purnima 2024 : यंदाची कोजागिरी पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 16 ऑक्टोबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Astrology 16 October 2024 : कोजागिरी पौर्णिमा काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 3 राशींचं नशीब पालटू शकतात.
Astrology 16 October 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून (Kojagiri Purnima 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 17 ऑक्टोबरला ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा तूळ राशीतील प्रवेश अतिशय शुभ मानला जातो. 20 ऑक्टोबरला मंगळ देखील कर्क राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब उजळेल. त्यामुळे यंदाची कोजागिरी 3 राशींसाठी सर्वांगी शुभ आणि भाग्याची ठरणार आहे. त्यामुळे ग्रहाच्या संक्रमणामुळे 16 ऑक्टोबरपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.
कोजागिरी पौर्णिमे 4 दुर्मिळ योग
1. समसप्तक योग
2. ध्रुव योग
3. महालक्ष्मी योग
4. वृद्धी योग
5. बुधादित्य राजयोग
16 ऑक्टोबरपासून 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी यंदाची कोजागिरी पौर्णिमा खूप शुभ असणार आहे. मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या अनेक संधी मिळतील आणि त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात सुधारणा दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचं एखादं काम पैशामुळे अडलं असेल तर ते पूर्ण होतील. व्यवसायात नफा मिळेल. एखादी नवी डील व्यवसायाला नवीन उंचीवर नेईल आणि चांगला आर्थिक नफा देखील देईल. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या मदतीने नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सर्व काही सामान्य असेल, ज्यामुळे तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल.
कन्या रास (Virgo)
कोजागिरी पौर्णिमेचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि येथून पुढे महिनाभर तुमची आर्थिक स्थिती देखील पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो परत येण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला स्वतःसाठी ऑनलाईन शॉपिंग करण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन योजना देखील राबवाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल, सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. आज तुम्ही तुमच्या काही मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी पार्टी आयोजित करू शकता.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शरद पौर्णिमेचा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खूप खास असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांवर देवी नारायणीची कृपा असेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतील. तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते सहज पूर्ण होईल आणि तुम्हाला गुंतवणुकीची संधीही मिळेल. तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचं प्रकरण पुढे जाऊ शकतं, ज्यामुळे सर्वजण खूप आनंदी दिसतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला फायदा होईल आणि त्यांची कामं वेळेवर पूर्ण होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी चांगल्या योजना कराव्या लागतील, तर त्यांना फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :