Kaal Bhairav Jayanti 2024 : हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला काल भैरव जयंती (Kaal Bhairav Jayanti 2024) साजरी केली जाते. शास्त्रानुसार, भगवान शिवाच्या (Lord Shiv) रौद्र रुपाची पूजा केली जाते. शास्त्रानुसार, या दिवशी भगवान शिव यांच्या भगवान शिव यांच्या रौद्र रुपात काल भैरव यांचा जन्म झाला होता. मान्यतेनुसार, काल भैरव जयंतीच्या दिवशी मध्यरात्री भगवान शिवाची पूजा केल्याने प्रत्येक रोग-दोषापासून मुक्ती मिळते. तसेच, सुख-समृद्धी नांदते. काल भैरव जयंतीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? तसेच, पूजा विधीची योग्य वेळ जाणून घेऊयात.
काल भैरव अष्टमी 2024 शुभ मुहूर्त (Kaal Bhairav Jayanti Shubh Muhurta 2024)
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही तिथी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे आज कालभैरव जयंती साजरी करण्यात येतेय.
काल भैरवर जयंतीला जुळून येणार शुभ योग (Kaal Bhairav Jayanti Shubh Yog 2024)
द्रिक पंचांगानुसार, यंदाची काल भैरव म्हणजेच कालाष्टमीच्या दिवशी रवि योग, ब्रह्म योग आणि इंद्र योग जुळून येणार आहेत. या दिवशी हे तीन शुभ योग जुळून येणार असल्यामुळे हा दिवस चांगला मानला जाईल.
काल भैरव जयंती पूजा विधी (Kaal Bhairav Jayanti Puja Vidhi 2024)
काल भैरव जयंतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दाखवा. भगवान शिवाचं नामस्मरण करावं. तसेच, फूल, माळ चढवण्याबरोबरच दिवाही लावावा. तसेच, देवाला नैवेद्य दाखवावा. देवासमोर दिवा ठेवावा. या दिवशी काल भैरव मंत्राचा जप करुन आरती करावी आणि प्रसाद वाटावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: