Health: निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीराला विविध व्हिटॅमिन्स, कॅल्शिअमची गरज असते. त्यापैकी व्हिटॅमिन बी-12 हे शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यास, मज्जातंतूंचे आरोग्य आणि शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, मुंग्या येणे आणि कमकुवत स्मरणशक्ती यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता चांगला आहार आणि निरोगी अन्नाच्या संयोजनाने सहजपणे भरून काढता येते.
व्हिटॅमिन बी 12 महत्वाचे का आहे?
व्हिटॅमिन बी-12 शरीरात रक्त निर्मिती आणि डीएनए वाढण्यास मदत करते. हे तंत्रिका पेशींचे संरक्षण करते. त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, पेशींचे नुकसान, थकवा, हात आणि पाय सुन्न होणे आणि स्मृतिभ्रंश यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शाकाहार करणाऱ्यांना बहुतेक वेळा याच्या कमतरतेचा धोका असतो, कारण ते मुख्यतः मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. अंडी देखील व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत आहे. विशेषतः त्याचा पिवळा भाग B-12 ने भरलेला असतो. पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल, ज्यांना शरीरातील या जीवनसत्वाची कमतरता लवकरात लवकर दूर करायची असेल तर ते अंड्यांसोबत इतर काही गोष्टी खाऊ शकतात. अंड्यांचे हे निरोगी मिश्रण तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल.
या गोष्टी अंड्यामध्ये मिसळा
हिरव्या पालेभाज्या
अंड्यांसह पालकाचे सेवन केल्याने शरीराला लोह आणि फॉलिक ॲसिड मिळते, जे व्हिटॅमिन बी-12 शोषण्यास मदत करते. तुम्ही स्क्रॅम्बल्ड अंडी किंवा ऑम्लेट सोबत पालक खाऊ शकता.
दुग्धजन्य पदार्थ
अंड्यांसोबत दूध, दही किंवा चीज खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त कॅल्शियम आणि बी-12 मिळतात. हे आरोग्यदायी मिश्रण तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. अंडी आणि दूध मिसळून हेल्दी पॅनकेक्स बनवता येतात.
मशरूम
मशरूम व्हिटॅमिन डीचा स्त्रोत आहे, जो शरीरात व्हिटॅमिन बी-12 चा विकास वाढवण्यास मदत करतो. अंडी आणि मशरूम ऑम्लेट किंवा भुर्जी हा एक चवदार आणि पौष्टिकतेने भरलेला पर्याय आहे, जो नियमितपणे खाल्ल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी-12 प्रदान करू शकतो.
मासे आणि चिकन
जे लोक नॉनव्हेज खातात ते अंडी खातच असतील. पण हे लोक अंड्यांसोबत सॅल्मन, ट्यूना किंवा चिकनसारखे इतर मांसाहारी पदार्थही घेऊ शकतात. यामुळे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन बी-12 आणि प्रोटीन दोन्ही मिळतील. अंडी तुम्ही चिकन सूपमध्ये मिसळून खाऊ शकता.
फोर्टिफाइड तृणधान्ये आणि नट
फोर्टिफाइड तृणधान्ये, सोया दूध आणि अक्रोड आणि बदाम यांसारख्या सुक्या मेव्यासह अंडी खाल्ल्याने तुम्हाला व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेवर मात करण्यास मदत होईल. उकडलेल्या अंड्यांसोबत भिजवलेले काजू तुम्ही नाश्त्यात घेऊ शकता. लक्षात ठेवा, ज्या लोकांना व्हिटॅमिन B-12 ची तीव्र कमतरता आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने B-12 सप्लिमेंट घेऊ शकतात.
हेही वाचा>>>
Women Health: जुळी मुलं कशी जन्माला येतात? कोणत्या महिलांमध्ये अशी शक्यता असते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )