Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2025 अनेक राशींसाठी शुभ असणार आहे. तर काही राशींना संकटांचा सामना करावा लागणार आहे. न्यायदेवता शनी (Lord Shani) 2025 मध्ये राशी परिवर्तन करणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाने अनेक राशीच्या (Zodiac Signs) लोकांना विशेष लाभ मिळणार आहे.
या कालावधीत मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल तर, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळेल. तर, 2 राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु होईल. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च 2025 रोजी न्यायदेवता शनी राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी रात्री 9 वाजून 44 मिनिटांनी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनी 3 जून, 2027 पर्यंत असणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाने सर्व राशींवर परिणाम होणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
नवीन वर्ष 2025 मध्ये सिंह राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु होणार आहे. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याबरोबर शनीचं शत्रुत्व आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांवर शनीच्या ढैय्याच्या दरम्यान सावधान राहण्याची गरज आहे. शनीच्या कृपेने भगवान विष्णूची पूजा करा. तसेच, हनुमान चालीसाचा पाठ करा.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहे. या राशीच्या लोकांवर देखील शनीची ढैय्या असणार आहे. नुकतीच धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या ढैय्या दरम्यान या राशीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून कच्च्या दुधाने भगवान विष्णूचं अभिषेक करा. तसेच, गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी नारायणाला श्रीफळ अर्पण करा. आणि विष्णू चालीसाचा पाठ करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: