Kartik Aryan Birthday : कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारत आपली स्वतःची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनात सोडली आहे. चित्रपट क्षेत्रात कोणीही गुरु नसताना, कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना मेहनतीच्या जोरावर कार्तिकने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलंय. बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीत त्याचा समावेश होतो. नुकताच रिलीज झालेल्या कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे. पण तुम्हाला माहिती का अभिनयाच्या आवडीमुळं कार्तिकला college मध्ये असतात त्याची गर्लफ्रेंड सोडून गेली होती. पुढे बॉलीवूडमध्ये आल्यावरही कार्तिक आर्यन त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींसोबतही त्यांचे नाव जोडले गेले. 22 नोव्हेंबर 2024 ला कार्तिक आर्यन त्याचा वाढदिवस साजरा करतोय. जाणून घेऊ त्याच्या लव्ह लाईफ विषयी इंट्रेस्टींग गोष्टी ..


 


अभिनय केलास तर सोबत राहणार नाही..


अभिनयाच्या आवडीमुळं कार्तिकला college मध्ये असतात त्याची गर्लफ्रेंड सोडून गेली होती. कार्तिक त्याच्या lovelife विषयी सांगताना सांगतो, माझ्या मैत्रिणीने मला सांगितले की मी अभिनय केला तर ती माझ्यासोबत राहणार नाही. ती म्हणाली होती की ती एका अभिनेत्याचे आयुष्य सांभाळू शकत नाही. 


 


सारा अली खानसोबत जोडलं गेलं नाव


2019 मध्ये अभिनेत्री सारा अली खानसोबत कार्तिकचं नाव जोडलं गेलं.इम्तियाज अलीच्या लव्ह आज कल 2 या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. या दोघांच्या डेटिंगची चर्चा होती. पण दोघांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. याबाबत कार्तिकने सांगितले होते की, मी कोणलाही डेट करत नाही. मी सिंगल आहे. पण कॉफी विथ करण शोमध्ये बोलताना साराने मी कार्तिकला डेट करत मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांचे ब्रेकअप झाले होते. आता दोघेही मित्रच आहेत.


अनन्या पांडेशी नाव जोडलं गेलं पण..


2021 मध्ये कार्तिक आणि अनन्या पांडेच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. 'पति पत्नी और वो' या चित्रपटात त्यांनी काम केले होते. दोघांनीही त्यांच्या नात्याला कधीही पुष्टी दिली नाही. पण करण जोहरने त्याच्या शोमध्ये त्यांच्या अफेअरचे संकेत दिले होते.


 


सोनू के टिटू की स्विटीनं दिली लोकप्रियता


कार्तिकने 2018 मध्ये रिलीज झालेला `सोनू के टीटू की स्वीटी`ने त्याला विनोदी प्रमुख अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. त्याने 12 वर्षांत 16 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात शॉर्ट फिल्म, धमाका, फ्रेडी यासारखे चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले. इतर 13 चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.