(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jupiter Transit 2024 : गुरु ग्रहाचं संक्रमण! पुढच्या 300 दिवसांत 'या' राशींना करणार मालामाल, धनसंपत्तीत होणार चिक्कार वाढ
Jupiter Transit 2024 : मेष राशीपासून ते वृषभ राशीत गुरुचं संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे.
Jupiter Transit 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रहाला सर्व ग्रहांचा देव मानलं जातं. गुरु ग्रह (Jupiter) ठराविक वेळेनंतर आपली चाल बदलतो. सध्य स्थितीत गुरु ग्रह हा वृषभ राशीत (Taurus Horoscope) विराजमान आहे. गुरु पुढच्या वर्षी बुधच्या राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीपासून ते वृषभ राशीत गुरुचं संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी शुभ तर काही राशींसाठी (Zodiac Signs) अशुभ ठरणार आहे. गुरुच्या वृषभ राशीत संक्रमण केल्याने पुढचे 300 दिवस आनंदाची बातमी मिळू शकते. याच संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु राशीचं संक्रमण फार लाभदायक असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याचीही संधी मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर असलेले वाद हळुहळु संपुष्टात येतील. गुरु ग्रहाच्या शुभ प्रभावांनी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. तसेच, धार्मिक कार्यात तुमची आवड वाढलेली दिसेल. फक्त वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणाचाही विनाकारण अपमान करू नका.
कन्या रास (Virgo Horoscope)
वृषभ राशीत गुरु ग्रहाचं संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभकारक असणार आहे. या कालावधीत तुमची अनेक दिवसांपासून थांबलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला भरपूर प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या पगारातही चांगली वाढ होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
गुरु ग्रहाच्या संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ होणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. तुमच्या खर्चात देखील वाढ होऊ शकते. त्यामुळे पैशांचा वापर करताना जपून करा. या कालावधीत तुम्ही नवीन कार्याची सुरुवात देखील करू शकता. वैवाहिक जीवन आनंदी असेल. मित्रांच्या साहाय्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीला यश मिळेल. त्यामुळे तुम्ही आनंदात असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: