July 2024 Festival : आषाढ मासारंभ, गुरुपौर्णिमा, संकष्ट चतुर्थीसह जुलै महिन्यात येतायत 'हे' मोठे सण; जाणून घ्या सण-उत्सवांच्या तारखा
July 2024 Month Festival : जुलै महिन्यात आषाढ महिन्याला देखील सुरुवात होत आहे. या महिन्यात अनेक व्रत-उत्सव केले जातात.
July 2024 Month Festival : सण-उत्सव आणि उपवासांच्या दृष्टीने जुलै महिना (July Month) खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यात जुलै महिन्यात आषाढ महिन्याला देखील सुरुवात होत आहे. या महिन्यात अनेक व्रत-उत्सव केले जातात. जुलै महिन्यात आषाढ मासारंभापासून अनेक मोठे सण (Festivals) साजरे केले जाणार आहेत.
जुलै महिना (July Month 2024) उपवास आणि सणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे, जुलै महिना हा वर्षातील सातवा महिना आहे. या महिन्यात प्रदोष व्रत, विनायक चतुर्थी, दुर्गाष्टमी, गुरुपौर्णिमा, कामिका एकादशी असे विविध सण (Festivals) आहेत. या महिन्याच्या अखेरीस संकष्ट चतुर्थी देखील आहे. जुलैमध्ये येणार्या प्रमुख उपवास आणि सणांची यादी जाणून घेऊया.
जुलै 2024 मधील महत्त्वाचे सण आणि उत्सव
2 जुलै 2024 - योगिनी एकादशी
3 जुलै 2024 - प्रदोष व्रत
5 जुलै 2024 - ज्येष्ठ अमावस्या
6 जुलै 2024 - आषाढ मासारंभ
8 जुलै 2024 - मुस्लिम नूतन वर्षारंभ
9 जुलै 2024 - विनायक चतुर्थी (अंगारक योग)
14 जुलै 2024 - दुर्गाष्टमी
17 जुलै 2024 - देवशयनी आषाढी एकादशी, मोहरम
19 जुलै 2024 - प्रदोष व्रत
20 जुलै 2024 - पौर्णिमा प्रारंभ, साईबाबा उत्सव प्रारंभ
21 जुलै 2024 - गुरुपौर्णिमा
22 जुलै 2024 - साईबाबा उत्सव समाप्ती शिर्डी
23 जुलै 2024 - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती
24 जुलै 2024 - संकष्ट चतुर्थी
31 जुलै 2024 - कामिका एकादशी
9 जुलै 2024 - विनायक चतुर्थी
हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे.
21 जुलै 2024 - गुरुपौर्णिमा
हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. गुरु हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो आपले अज्ञान दूर करतो आणि आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :