January 2025 Monthly Horoscope : 2024 वर्ष सरुन नवीन वर्ष 2025 (New Year) चं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत. अवघ्या काही तासांतच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी देखील काही राशींसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार, जानेवारीमध्ये तूळ ते मीन राशींसाठी हा महिना (Monthly Horoscope) कसा असेल? जाणून घ्या.


तूळ रास (Libra Monthly Horoscope January 2025)


तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना फार आरामदायी असणार आहे. या काळात तुमचं मन शांत आणि स्थिर असेल. तुमच्या मनात कसलीच घालमेल नसणार. तसेच, तुमचे विचार पक्के असतील. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, नवीन व्यक्तींशी भेटीगाठी होतील. 


वृश्चिक रास (Scorpio Monthly Horoscope January 2025)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. या काळात तुमची संवादकौशल्या क्षमता दिसून येईल. तसेच, चौरचौघांत तुमच्या भेटीगाठी होतील. तुमची निर्णयक्षमता चांगली दिसून येईल. भावा-बहि‍णींच्या नात्यात गोडवा दिसून येईल. तसेच, या काळात तुमचे प्रवासाचे योग देखील जुळून येणार आहेत. 


धनु रास (Sagittarius Monthly Horoscope January 2025)


धनु राशीसाठी जानेवारी महिना आर्थिक भरभराटीचा असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. अशा वेळी तुमच्या खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 


मकर रास (Capricorn Monthly Horoscope January 2025)


मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्याबरोबर सकारात्मक गोष्टी घडतील. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या करिअरच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्याल जो तुमच्या भविष्यासाठी देखील महत्त्वाचा असणार आहे. जे लोक सिंगल आहेत ते मिंगल होण्याची शक्यता आहे. 


कुंभ रास (Aquarius Monthly Horoscope January 2025)


कुंभ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना आत्मपरिक्षणाचा असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या बोलण्यामुळे कोणीही दुखावला जाऊ नये याची काळजी घ्या. 


मीन रास (Pisces Monthly Horoscope January 2025)


मीन राशीच्या लोकांसाठी नवीन महिना चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची नेटवर्किंग क्षमता चांगली असल्या कारणाने नोकरीचा शोध घेण्यात तुम्हाला याचा चांगला लाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग आहेत. आरोग्य एकदम ठणठणीत असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:             


January 2025 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जानेवारी महिना कसा असणार? वाचा मासिक राशीभविष्य