Pune Pub News: पुण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबमधील हा प्रकार आहे. 31 डिसेंबरच्या आधी ग्राहक अधिकाधिक आपल्याकडे खेचण्यासाठी पब व्यवस्थापक अशा प्रकारच्या युक्ती लढवत असतात. त्याचपद्धतीने पुण्यातील स्पिरिट कॅफे या पबकडून कंडोम, ओआरएस आणि सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. संबंधित प्रकार समोर येताच आणि पोलिसांची चौकशी सुरु होताच कंडोम वाटणं गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करतोय. जनजागृती व्हावी यासाठी आम्ही कंडोम, सॅनिटरी पॅड्स वाटत आहे, असा दावा संबंधित पबकडून करण्यात आला होता. ही गोष्ट समोर आल्यानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात आली, त्यानंतर आता ही पार्टी रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा केला दावा
तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबकडून करण्यात आलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंदवले गेले आहेत. कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा पब व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. तर ही बाब समोर आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली आहे.
युवक काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिटकडून नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे, असे तक्रारीच्या पत्रात लिहले आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे, असं सुद्धा या पत्रात नमूद आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पब कडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले आहेत. या पब व्यवस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र, कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.