January 2025 Monthly Horoscope : 2024 वर्ष सरुन नवीन वर्ष 2025 (New Year) चं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत. अवघ्या काही तासांतच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी देखील काही राशींसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार, जानेवारीमध्ये मेष ते कन्या राशींसाठी हा महिना (Monthly Horoscope) कसा असेल? जाणून घ्या.


मेष रास (Aries Monthly Horoscope January 2025)


मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा पहिला पहिला फार चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत चांगलं यश मिळेल. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. या काळात तुम्ही प्रेमाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडणं गरजेचं आहे. तसेच, जे लोक अविवाहित आहेत त्यांना या काळात चांगला जोडीदार मिळू शकतो. कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे. 


वृषभ रास (Taurus Monthly Horoscope January 2025)


वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना फार रोमांचक असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, या काळात प्रवासाचे भरपूर योग आहेत. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, या महिन्यात तुम्ही नवीन गोष्टी शिकाल. या काळात योग, ध्यान आणि व्यायामाला महत्त्व द्या. 


मिथुन रास (Gemini Monthly Horoscope January 2025)


मिथुन राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना भरभराटीचा असणार आहे. या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच, तुमची पर्सनल ग्रोथ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही मन लावून काम कराल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेतच, प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला एखादी चांगली वार्ता ऐकायला मिळेल. कुटुंबियांबरोबर चांगला वेळ जाईल. 


कर्क रास (Cancer Monthly Horoscope January 2025)


कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना चांगला असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, टीम वर्कमध्ये तुम्ही काम करु शकाल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तसेच, या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील. 


सिंह रास (Leo Monthly Horoscope January 2025)


सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना चांगला असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच, तुमच्यावर कोणतंच कर्ज राहणार नाही. तुमच्या पार्टरबरोबर तुम्ही मोकळा वेळ घालवाल. तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्याल. नवीन नोकरीच्या बाबतीत सतर्क राहाल. तसेच, प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल असेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष दिलं पाहिजे. 


कन्या रास (Virgo Monthly Horoscope January 2025)


कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना क्रिएटिव्ह असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कलागुणांना चांगला वाव देता येईल. तसेच, तुमच्या कंफर्ट झोनच्या बाहेर तुम्ही याल. नोकरीच्या नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या असतील. या संधीचा वेळीच लाभ घ्या. तसेच, वर्षाचा पहिला महिना असल्या कारणाने नवीन संकल्प करा,


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                       


Shani Vakri 2025 : नवीन वर्षात तब्बल 138 दिवस शनीची वक्री चाल; वर्षाच्या मध्यात 'या' 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर