Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलाला कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या वेव मल्टी सर्व्हिसेसच्याच व्यवस्थापकाचे हात बरबटलेले असल्याचे आता समोर आले आहे. (Sports Complex Scam) घोटाळ्याचा प्रमुख आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने वेव मल्टीसर्व्हिसेसचा नागेश श्रीपाद डोंगरे याला 80 लाख रुपये दिल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळताच नागेशला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेकडून या विभागीय क्रीडा संकुलाला पूर्वी दिशा फॅसिलिटीज प्रा. ली. तर्फे कर्मचारी पुरवले जात होते. 2023 मध्ये डोंगरेच्या वेळ मल्टी सर्विसेस मार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरू करण्यात आली . विभागाचा कोट्यावधी रुपयांचा निधी लंपास केलेल्या हर्षकुमारने उच्चभ्रू आणि आलिशान जीवनशैलीवर पैसे खर्च केले. सहकाऱ्यांसह मैत्रिणी आणि आता त्याची नियुक्ती केलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाला देखील त्यांनी 80 लाख रुपये दिल्याचे निष्पन्न झाले.
अर्पिता च्याही पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ
हर्षकुमारच्या पैशांची मुख्य वाटेकरी असलेली अर्पिता वाडकर हिच्या पोलीस कठोडीची सोमवारी मदत संपल्याने नागेश आणि अर्पिताला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने नागेश ला चार दिवसांची पोलीस कुठली सुनावली. तर अर्पिताच्याही पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली. यापूर्वी अटक केलेले यशोदा शेट्टी आणि तिचा पती जीवन कार्याप्पा विंदडा हे अद्यापही पोलीस कोठडीत आहेत.
हर्षकुमारची मुंबईमध्ये देखील गुंतवणूक
अर्पिता राहत असलेल्या नवी मुंबईच्या परिसरात देखील हर्ष कुमारने कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याशिवाय शेंद्रा रोडवरील दोन गाळ्यांपैकी एक गाळा अर्पिताच्या नावावर केला आहे. त्याशिवाय कुठे होती रुपयांचे दागिने देखील अर्पिताला त्याने दिले होते. याची अधिकृत मोजदाद सुरू असल्याचे सांगून निश्चित आकडेवारी मात्र पोलिसांनी जाहीर केली नाही.
पसार होण्यापूर्वी मालेगावला मामाची भेट
21 डिसेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हर्षकुमार पसार झाला. त्याच्याकडे आत्तापर्यंत बीएमडब्ल्यू ,महिंद्रा कंपनीची एक कार आणि दुचाकी असल्याचे समोर आले. घोटाळा उघड होण्याची काही दिवस आधीच त्याने स्कोडा कंपनीची कार खरेदी केली होती. गुन्हा दाखल होताच हर्षकुमार ती कार घेऊन मालेगाव च्या मामाकडे गेला. त्याला भेटून त्याच्याकडेच ती कार ठेऊन महिंद्रा कंपनी ची कार घेऊन पसार झाला. पोलिसांनी सोमवारी मालेगाव वरून ही कार जप्त केली.
कोणाच्या नावावर किती मालमत्ता?
हर्षकुमारची मालमत्ता
बँक खात्यात 3 कोटी
1.20 कोटींची बीएमडब्ल्यू
32 लाखांची बीएमडब्ल्यू बाईक
वडिलांच्या नावावर सिद्धांत ड्रीम होममधील फ्लॅट : 28 लाख
स्कोडा - 20 लाख
इंटेरीअर - 1 कोटी
चीनमधून 50 लाखांचे साहित्य खरेदी
एकूण - 6 कोटी 50 लाख
यशोदा शेट्टीची मालमत्ता
बँक खात्यात - 2.5 लाख
जीवनची मालमत्ता
बँक खात्यात 1.69 कोटी
एसयूव्ही 700 कार - 27 लाख
अप्रतिम पार्कमधील फ्लॅट : 28 लाख
एकूण - 2.25 कोटी
अर्पिताची मालमत्ता
तीन बँक खात्यात 1 कोटी 1 लाख
माय वर्ल्डमधील फ्लॅट - 1.35 कोटी
मुंबईतील फ्लॅट - 1.05 कोटी
गोलकधाम येथील गाळा - 50 लाख
स्कोडा - 15 लाख
आयफोन - 1 लाख 44 हजार
सॅमसंग फोल्ड - 1 लाख 09 हजार
एकूण सुमारे - 4 कोटी 7 लाख
नागेश डोंगरेची मालमत्ता
बँक खात्यात 80 लाख
हेही वाचा: