एक्स्प्लोर

Horoscope Today, September 29, 2022 : मेष, कन्यासह या राशींसाठी दिवस असणार खास!  जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 29, 2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांना आज प्रवास करावा लागू शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 29, 2022 : आज चंद्र विशाखा नक्षत्रात असून, तूळ राशीत आहे. सूर्य कन्या राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांना आज प्रवास करावा लागू शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. आज व्यवसायात काहीतरी नवीन बदल करण्याचा विचार मनात येऊ शकतो. व्यवसायातील मंदीमुळे तुम्ही थोडे चिंतेत राहाल. कोणतेही रखडलेले सरकारी काम आज पूर्ण होईल. प्रवास घडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती आनंददायी आणि उत्साहवर्धक राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल.

वृषभ (Taurus Horoscope) : कला क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबात मागील बराच काळ सुरु असलेला वाद, आज संपुष्टात येईल. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. काही आर्थिक बाबतीत वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. एखादी मोठी गुंतवणूक करू शकता. प्रत्येक कामात भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस मानसिक तणावाने भरलेला असेल. आर्थिक कोंडी वाढेल. तथापि, भूतकाळात केलेल्या काही चांगल्या कामांमुळे यश मिळू शकते. चिंतांपासून मुक्त व्हाल. नात्यातले गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक बाबतीत धोका पत्करू नका. गोंधळ वाढतील. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. सकारात्मक विचार करा.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. वडिलांकडून आर्थिक पाठबळ मिळेल. अधिक धावपळ होईल. लाभाच्या संधी मिळतील. बोलण्यात गोडवा राहील. मनात निराशा आणि असंतोषाची भावना असेल. आरोग्याबाबत सावध राहा. मित्रांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास भरपूर असेल. कुटुंबात परस्पर सहकार्य मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : दिवसाच्या सुरुवातीला धनहानी होऊ शकते. जोडीदारासोबत मनातील भावना शेअर करा. ऑफिसच्या कामात आज केलेल्या मेहनतीचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल. कुटुंबातील एखाद्या खास व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. प्रवासाची योजना बनू शकते. आजच्या दिवशी चुकूनही असे कोणतेही काम करू नका, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल.

कन्या (Virgo Horoscope) : तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रिय व्यक्तींची भेट होईल. विरोधकांवर विजय मिळवू शकाल. दुपारनंतर परिस्थिती बदलेल. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या काही चिंता जाणवेल. मालमत्तेसाठी प्रयत्न करणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी दिवस मेहनतीचा असणार आहे. अध्यात्माकडे ओढ वाढेल.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. व्यवसाय करणारे लोक नवीन प्रकल्प सुरू करू शकतात, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल. परंतु, काही तणावामुळे मन अस्वस्थ राहील आणि तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे धावपळ होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : विद्यार्थ्यांमध्ये करिअरबाबत उत्साह राहील. आज मनातील एखाद्या गोष्टीबद्दल तुमची आनंदी असाल. व्यवसायाशी संबंधित काही किरकोळ समस्या सोडवण्यात व्यस्त असाल. आर्थिक बाजू मजबूत राहील. भेटवस्तू मिळतील आणि सन्मान वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील महत्त्वाची जबाबदारी पार पडेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. प्रियजनांचे सहकार्य मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. वैवाहिक जीवनात प्रेमाचा अनुभव येईल. उत्साह राहील. समाजात तुमचा सन्मान वाढेल.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे तुम्ही तणावात असाल, त्यामुळे तुम्हाला कोणताही निर्णय शांतपणे घ्यावा लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकाऱ्याकडून काम करून घेण्यासाठी गोड गोड बोलावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही समस्या येत असतील, तर त्यांचे निराकरण होईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्ही नवीन काम हातात घ्याल. भाग्य तुमच्या सोबत राहील. नोकरी-व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मित्रांकडून लाभ मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि समाधान मिळू शकेल. प्रवासाला जावे लागण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक आनंद मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.

मीन (Pisces Horoscope) : मीन राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. या दिवशी गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही कामे करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल. दिवसभरात चांगली बातमी मिळेल. भेटवस्तू मिळतील, सन्मान वाढेल. सरकारी कामात सहकार्य मिळू शकते. आर्थिक बाबींचे नियोजन करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

संबंधित बातम्या : 

शनिदेवाची पूजा करण्यासाठी शनिवारी उत्तम योग, 'या' पाच राशींचा आहे खास दिवस 

Geeta Gyan : भगवान कृष्णाचे हे 4 गुण तुमचे जीवन बदलू शकतात, जाणून घ्या जीवनाचा खरा मंत्र

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget