एक्स्प्लोर

Horoscope Today, September 13, 2022 : मेष ते मीन राशींसाठी कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 13,  2022 : मेष राशीच्या लोकांना गुंतवणूक करणे पुढे ढकलावे लागेल. वृषभ राशीच्या लोकांची आज धावपळ होईल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 13,  2022 :  आज चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. रेवती नक्षत्र आहे. सूर्य सिंह राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना गुंतवणूक करणे पुढे ढकलावे लागेल. वृषभ राशीच्या लोकांची आज धावपळ होईल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. जर तुम्ही नोकरीसोबतच कोणतेही दुसरे काम करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला वेळ काढता येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना गुंतवणूक टाळावी लागेल. अन्यथा त्यांना नुकसान होऊ शकते. एकत्र बसून जोडीदारासोबतचे कोणतेही भांडण, वाद संपवावे लागतील. बोलण्यावर संयम ठेवा.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्ही खूप व्यस्त असाल. जास्त धावपळ होऊ शकते. तुमच्या निर्णय क्षमतेचा आज तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, तर ती आजच करा फायदा मिळेल. शुभ समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्वतःला वेळ द्या आणि आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरीत अधिकारी तुमच्या कामावर खूश राहू शकतात. व्यवसायातही उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. वडीलधार्‍यांच्या आशीर्वादाचा तुम्हाला फायदा होईल. मित्रांकडून लाभ होऊ शकतो. काही सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहावे लागेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्ततेचा असणार आहे. आळस सोडून महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल. कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनी कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करावे. अनावश्यक अहंकार तुमच्यासाठी चांगला नाही.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखण्यासाठी तुम्हाला घरातील आणि बाहेरची कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. शत्रूही यावेळी तुमच्यापुढे झुकताना दिसतील, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागेल, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थितीसाठी बजेटचे नियोजन करावे लागेल.

कन्या (Virgo Horoscope) : वैवाहिक सुखात वाढ होईल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. मनःशांती लाभेल. वाचनाची आवड निर्माण होईल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्याचे सुखद परिणाम होतील. सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. परस्पर नात्यात जवळीकता येईल. परदेश दौऱ्यावर जावे लागू शकते.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. उत्पन्न वाढल्याने आनंदी व्हाल. कुटुंबात सुख-शांती नांदत असल्याने, कुठेतरी सहलीला जाण्याचा प्लॅनही करू शकता. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांचा खर्च वाढू शकतो, परंतु त्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. पालकांशी काही मुद्द्यावर वाद होऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्ही कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय चर्चेत भाग घेऊ शकता. नोकरदार लोकांना काही चांगले काम करता येईल. तुमची कीर्ती वाढेल. व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. आर्थिक लाभामुळे मनात उत्साह राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबतचा वाद मिटवा.

धनु (Sagittarius Horoscope) : मन अस्वस्थ होईल. नकारात्मक विचारांचा प्रभाव टाळण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक कामावर लक्ष केंद्रित करा. कामात व्यत्यय येऊ शकतो. आरोग्याबाबत सावध राहा खर्च वाढतील. शांत व्हा, संयमी राहण्याचा प्रयत्न करा. पालकांचे सहकार्य मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधीही मिळू शकतात. बोलण्यावर संयम ठेवा.

मकर (Capricorn Horoscope) : आज अनावश्यक खर्च इच्छा नसतानाही मजबुरीने करावे लागतील. लोकांकडून मान-सन्मान मिळेल. व्यवसायात रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन कामात गुंतवणूक करायची असेल, तर नक्की करा, भविष्यात फायदा होईल. जर तुम्हाला एखाद्या सदस्याच्या कारकिर्दीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो अत्यंत काळजीपूर्वक घ्या.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्ही उत्साहात असाल. समस्या कमी होतील. कामात काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घाईघाईने कोणाशीही व्यवहाराचा निर्णय घेणे टाळावे लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. प्रलंबित कामे सहज पूर्ण करू शकाल. पैसा खर्च करताना विचार करा. अनावश्यक खर्च टाळा.

मीन (Pisces Horoscope) : आज तुमच्या घरात धार्मिक कार्ये होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कामात यश मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. नवीन कामासाठी दिवस चांगला आहे. दुपारनंतर तुमच्या स्वभावात बदल होईल. बोलण्यात आणि वागण्यात संतुलन ठेवावे लागेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. व्यवसाय वाढवण्यासाठी प्रवास करावा लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget