Horoscope Today, September 12, 2022 : मिथुन, वृश्चिकसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंदमय! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, September 12, 2022 : मेष राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांचे मतभेद होऊ शकतात. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
Horoscope Today, September 12, 2022 : आज चंद्र मीन राशीत असून, उत्तराभाद्रपद नक्षत्र आहे. सूर्य सिंह राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांचे मतभेद होऊ शकतात. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणताही निर्णय घाईघाईत घेणे टाळावे लागेल. कामाच्या ठिकाणीही तुमच्याबद्दल रागाची भावना उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला बोलण्यात संयम बाळगावा लागेल. स्वतःपेक्षा इतरांच्या कामावर जास्त लक्ष द्याल, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
वृषभ (Taurus Horoscope) : आज नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात एखाद्या व्यावसायिकाशी मतभेद होऊ शकतात. मात्र, तुम्ही तुमच्या कामाच्या कौशल्याने शत्रूंवर विजय मिळवाल. घरगुती सामानाची खरेदी होईल. भरपूर पैसे खर्च होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवा, समाजात मान-सन्मान वाढेल. अनावश्यक खर्च करणे टाळा.
मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असेल. कार्यालयात सहकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. सामाजिक दृष्टिकोनातून तुमची प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नतीची शक्यता आहे. नातेवाईकांकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवन सुखमय होईल. गुंतवणूक करताना विचार करा.
कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. मुलांच्या भविष्यासाठी पैसे वाचवण्याचा विचार करावा लागेल. कोणताही निर्णय घ्यायचा असेल, तर कुटुंबातील सदस्य आणि जोडीदाराशी बोलूनच घ्यावा. एखाद्या छोट्या पार्टीच्या आयोजनाने कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील आणि जर तुम्हाला व्यवहारात कोणतीही समस्या येत असेल, तर ती देखील आज संपेल.
सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होईल. हातातील कामात परिश्रम करावे लागतील, मात्र सावधगिरीही बाळगा. कार्यक्षेत्रात सन्मानाच्या संधी मिळतील. विरोध होऊनही ठरवलेली कामे पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे, मात्र संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करा.
कन्या (Virgo Horoscope) : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज तुम्ही इतरांवर थोडा जास्त खर्च करू शकता. तुमचे महत्त्वाचे काम पुढे ढकलले जाऊ शकते. वैयक्तिक जीवनात, तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांच्या जवळ याल. समाजात तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढल्यामुळे तणाव वाढू शकतो. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.
तूळ (Libra Horoscope) : आज तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरीत प्रगती होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात लाभ होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवू शकाल. जोडीदाराशी संबंध घट्ट होतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी घरातील कोणत्याही समस्येवर चर्चा करू शकता. बोलण्यात संयम ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामात यश मिळेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुमची जुनी भांडणे दूर होतील. जर तुमच्यावर काही कर्ज असेल, तर तेही कमी होईल. आरोग्य चांगले असल्यामुळे तुम्ही प्रत्येक काम सहजपणे करू शकाल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते. बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही तुमच्या विरोधकांनाही पराभूत करू शकाल. चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
धनु (Sagittarius Horoscope) : मानसिकदृष्ट्या आज तुमच्यात उत्साहाची कमतरता असेल, ज्यामुळे मनात अस्वस्थता राहील. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद झाल्यामुळे कौटुंबिक वातावरण अस्वस्थ राहील. स्थायी मालमत्तेच्या कागदोपत्री कामात विशेष काळजी घ्या. धनहानी होण्याचा योग आहे. बदनामी होणार नाही, याची काळजी घ्या. तब्येतीची चिंता राहील. शक्य असल्यास, आज विश्रांती घ्या.
मकर (Capricorn Horoscope) : आज नवीन व्यवहारातून अचानक धनलाभ होईल. जोडीदाराची किंवा मुलाची तब्येत अचानक बिघडल्याने घरात तणाव निर्माण होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम करताना किंवा वाहन चालवताना तणावात राहू नका. मैत्रीमध्ये कोणत्याही योजनेचा भाग बनू नका. जोखमीच्या कामांपासून दूर रहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा भविष्यात पैशांची कमतरता भासू शकते.
कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने आनंद होईल. परंतु, काही अनावश्यक खर्च नियंत्रणाबाहेर राहतील, ज्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. आज कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकता. आजचा दिवस सामाजिक दृष्टीकोनातून चांगला जाणार आहे.
मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. उत्साह कायम राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. धनलाभ होईल. अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. धार्मिक प्रवासाचा योग आहे. कामात यश मिळेल. गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना कोणत्याही लालसेत पडू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या