एक्स्प्लोर

Horoscope Today, May 10, 2022 : मेष, कर्कसह ‘या’ राशींना कोणत्याही कामात संयम बाळगावा लागेल! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, May 10, 2022 : मेष, तसेच सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. वृषभेच्या लोकांनी अति ताण टाळावा.

Horoscope Today, May 10, 2022 : आज चंद्र सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनी कुंभ राशीत आहे. मेष, तसेच सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. वृषभेच्या लोकांनी अति ताण टाळावा. जाणून घेऊया आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : कोणत्याही बाबतीत आळस केलात, तर तुमचे काही काम बिघडू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. प्रेमात मतभेद होऊ शकतात. आरोग्य स्थिती मध्यम असेल, परंतु व्यवसायाची स्थिती चांगली राहील. भावनेच्या भरात या दिवशी कोणताही निर्णय घेऊ नका. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील.

वृषभ (Taurus Horoscope) : नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल होईल. भौतिक सुखात आणि संपत्तीत वाढ होईल. आरोग्य आणि प्रेमाची स्थिती चांगली राहील. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ आनंददायी आहे. आपल्या प्रियजनांशी भांडण करू नका. लाभाच्या संधी मिळतील. अनावश्यक ताण टाळा. तुम्ही विचार केलेले काम नक्कीच पूर्ण होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या स्पर्धेबाबत जागरूकता निर्माण होईल.

मिथुन (Gemini Horoscope) : परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला काही चांगली माहिती ऐकायला मिळू शकते. मित्राच्या मदतीसाठी काही पैशांची व्यवस्था देखील करू शकता. व्यवसाय करणारे लोक एखाद्याचे नवीन तंत्रज्ञान वापरून पाहतील, ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. नोकरीत तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढू शकते.

कर्क (Cancer Horoscope) : बोलण्यात गोडवा राहील. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मान-सन्मान मिळेल. उत्पन्न वाढेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. कामात उत्साह राहील. संयमाचा अभाव राहील. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पैशाची आवक वाढेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. आज कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सुरू असलेला वाद तुम्ही सोडवू शकाल. व्यवसाय करणार्‍यांच्या मनात कोणतीही नवीन कल्पना असेल, तर त्यांनी ती ताबडतोब अवलंबली पाहिजे, तरच ते त्यातून नफा मिळवू शकतात. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. आरोग्य आणि व्यवसाय पूर्वीपेक्षा चांगले होईल.

कन्या (Virgo Horoscope) : शैक्षणिक कार्यात रुची राहील. बौद्धिक कार्यातून उत्पन्न वाढेल. मित्रासोबत सहलीला जाण्याची योजना बनवू शकता. आरोग्याबाबत सावध राहा. कामाची व्याप्ती वाढेल. आत्मविश्वासाची कमतरता राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. दैनंदिन जीवन व्यस्त राहील. अडकलेले पैसे मिळतील. वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका.

तूळ (Libra Horoscope) : या दिवशी तुमच्या उत्पन्नात अपेक्षेप्रमाणे वाढ होईल. एखादी चांगली बातमी मिळेल. आरोग्य आणि व्यवसाय चांगला राहील. प्रेमाची साथ मिळेल. बिझनेस पार्टनरशी वाद घालू नका. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. एखाद्या धार्मिक स्थळी यात्रेला जाऊ शकता.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : अभ्यासात रुची राहील. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम होतील. बौद्धिक कार्यातून उत्पन्न वाढेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. भौतिक सुखात वाढ होईल. अनियोजित खर्च वाढतील. आनंदाच्या क्षणात वाढ होईल. शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा तुम्हाला फायदा होईल. परंतु तुम्हाला कोणाच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करण्याची गरज नाही

धनु (Sagittarius Horoscope) : प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. तुमचे कामही रखडू शकते. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सल्ला घ्यायचा असेल, तर तो एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून घ्या. भावनेच्या भरात या दिवशी कोणताही निर्णय घेऊ नका. मन अस्वस्थ होऊ शकते. कार्यक्षेत्रात बदल संभवतो. कामाची व्याप वाढेल. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल.

मकर (Capricorn Horoscope) : अनावश्यक राग आणि वाद टाळा. कौटुंबिक जीवन कठीण होऊ शकते. कोणत्याही मालमत्तेतून पैसा मिळू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल. बहीण-भावांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. काही क्षण नाराजी आणि अवघडलेली मन:स्थिती राहील. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही पैसेही खर्च कराल.

कुंभ (Aquarius Horoscope) : नोकरीशी संबंधित लोकांना त्यांच्या कनिष्ठांच्या काही चुका माफ कराव्या लागतील, तरच ते त्यांचे काम वेळेवर पूर्ण करू शकतील. एखाद्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी जाल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामात वाढ झाल्यामुळे चिंतेत पडू शकता. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. वडिलोपार्जित मालमत्ता उत्पन्नाचे साधन बनू शकते.

मीन (Pisces Horoscope) : अनावश्यक भांडणे आणि वाद टाळा. व्यर्थ धावपळ होईल. व्यवसायात सुधारणा होईल. प्रवास लाभदायक ठरेल. जमा झालेला पैसा कमी होऊ शकतो. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. चांगली बातमी मिळू शकते. उधळपट्टी टाळावी लागेल, अन्यथा पैसे संपू शकतात. एखाद्या कामात थोडी जास्त धावपळ होईल. कुटुंबातील सदस्याकडून काही चांगला सल्ला मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget