एक्स्प्लोर

Horoscope 28 March 2022: वृषभ, कन्या अन् मीन; 'ही' रास असणाऱ्यांनी द्या विशेष लक्ष; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 March 2022 : आज श्रवण नक्षत्र आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य-

Horoscope Today 28 March 2022 : पचांगानुसार, आज 28 मार्च 2022 रोजी चैत्र माहिन्याची कृष्ण पक्षाची एकादशी ही तिथी आहे. या एकादशीला पापमोचनी एकादशी असेही म्हणतात. आज चंद्र मकर राशीत असेल. आज श्रवण नक्षत्र आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य-

मेष (Aries Horoscope)- आजच्या दिवशी चांगली संगत आणि सत्संग करणे लाभदायक ठरेल. नोकरी व्यावसायिकांनी त्यांचा डेटाबेस अतिशय मजबूत ठेवावा. तसेच हा डेटा सांभाळून ठेवा. ग्रहांच्या स्थितीमुळे डेटा नष्ट होऊ शकतो. तुमचे मनोबल कमी होऊ देऊ नका. प्रत्येक क्षण हा क्रिएटिव्ह आणि सुंदर असावा.  ज्या लोकांचा व्यवसाय फॅशन डिझायनिंगशी संबंधित आहे त्यांना आज चांगला फायदा होणार आहे. त्वचेशी संबंधित समस्यांबाबत सतर्क राहावे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.  

वृषभ राशी (Taurus Horoscope)- वैयक्तिक नाती आज आणखीन मजबूत होती. जर सकाळी उशिरा उठायची सवय असेल तर ही सवय बदलणे आवश्यक आहे. लवकर झोपा लवकर उठा. अचानक ऑफिसच्या कामानिमित्तानं प्रवास करावा लागेल. व्यापारी वर्गाने आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावे अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. ज्यांना हाय बीपीची समस्या आहे, त्यांनी प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. अविवाहितांसाठी विवाहचा योग असू शकतो. चांगल्या नात्याबद्दल चर्चा पुढे जाऊ शकते. 

मिथुन राशी (Cancer Horoscope)-  भविष्यातील चिंतेबद्दल जास्त विचार करणे व्यर्थ आहे, असे केल्याने महत्त्वाचा वेळ वाया जाईल. तसेच, ग्रहांची स्थिती पाहता, आवश्यक तेवढीची विश्रांती घ्या. आयटी सेक्टरच्या संबंधित लोकांना मोठ्या कंपनीची ऑफर मिळू शकते. विद्यार्थी आगामी काळात चांगली कामगिरी करतील. दुधाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी डिल होऊ शकते.  प्रकृतीकडे लक्ष द्या. हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे.  

कर्क(Cancer Horoscope)-  आज महादेवाची पूजा करावी. सर्व महिलांचा आदर करा. ऑफिसमधील महिला सहकारी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करत असती तर त्यांना नक्कीच मदत करा. त्यांचा आशीर्वीद बिघडलेली काम पूर्ण करेल. कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना  करावी लागेल. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा फायदा होऊ शकतो. मायग्रेनची समस्या असणाऱ्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मित्रांसोबत धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करा. 

सिंह राशी (Leo Horoscope)- आजचा दिवस सुख-सुविधा वाढवणारा असेल, त्यामुळे मोठी खरेदी करण्याची योजना करता येईल. सामाजिक प्रतिमा मजबूत होईल आणि लोक तुमच्या गुणांचे कौतुक करतील. ऑफिसमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्यांनी आज सतर्क राहावे, काही कारणाने वाद होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी पार्टनरने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा द्यावा. आरोग्याच्या बाबतीत, विशेषत: तुम्हाला जुनाट आजारांपासून सावध राहावे लागेल, कारण आरोग्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यानं पुन्हा त्रास होऊ शकतो. 

कन्या (Virgo Horoscope)- जबाबदाऱ्यांचे ओझे काहींना त्रास देऊ शकते.  भविष्यातील कामाच्या योजनांसाठी ऑफिसमध्ये एखादी मिटींग होऊ शकते, ज्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल,   बोलताना अपशब्दांचा वापर होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. व्यावसायिकांना जास्त रागामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. आईला नाराज करू नका. कारण तिचा आशीर्वाद तुमच्यासाठी आवश्यक आहे. 

तुळ राशी (Libra Horoscope)- कामामुळे धावपळ होऊ शकते.  सेल्स संबंधित व्यवसाय असणाऱ्यांचे टार्गेट पूर्ण होईल. विद्यार्थी कंबाइन स्टडी करतील. मधुमेय असणाऱ्यांनी वेळेत औषध घेणं आवश्यक आहे. ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना कुटुंबाकडून चांगले गिफ्ट मिळेल. क्रेडिट कार्डचा वापर करून विनाकारण शॉपिंग करणे टाळा. 
 
वृश्चिक (Scorpio Horoscope)-आज तुमचा दिवस चांगला जाईल, कारण ग्रहांची स्थिही ही चांगली आहे. नोकरी करणाऱ्यांचे काम थांबले असेल तर ते लवकरच पूर्ण होईल. बऱ्याच काळ असणाऱ्या आजारांमुळे होणारा त्रास कमी होईल, पण डॉक्टरांच्या सल्ला न घेताला कोणतेही औषध घेणं टाळा. छोट्या भावाला किंवा बहिणीला आर्थिक मदत करावी लागेल. 
 
धनु राशी  (Sagittarius Horoscope)-आज केलेलं कष्ट वाया जाणार नाहित.  पैसा खर्च आणि पैशाची गुंतवणूक दोघांमध्ये संतमतोल राखा. नवीन उर्जेने काम करा, यशाच्या पूर्ण शक्यता दिसत आहेत. जर तुम्ही नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते आता करू शकता. पाठ दुखीचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्यानं दु:ख होऊ शकते. 

मकर(Capricorn Horoscope)-  बँक बॅलेन्स वाढेल. खेळामध्ये करिअर करणाऱ्यांनी त्यांच्या पर्फोर्मन्सकडे विशेष लक्ष द्या, त्यांना स्पर्धेमध्ये यश मिळेल.  आळस न करता काम पूर्ण करा. त्वचा किंवा कानाच्या निगडीत समस्या जाणवू शकतात. क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे खर्च करणं टाळा. 

कुंभ(Aquarius Horoscope)-  व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष ठेवावे लागेल, कारण ग्रहाच्या स्थितीमुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपडेट रहावे लागेल. मीडियाशी संबंधित लोकांना ऑफिसमधून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. विद्यार्थांना मेहनत करावी लागेल. डाएटकडे विशेष लक्ष द्या. 

मीन(Pisces Horoscope)-जास्त मेहनत करू नका. बँकमध्ये काम करणाऱ्यांचे प्रमोशन होऊ शकते. बिझनेस पार्टनरसोबत चांगले संबंध ठेवा. डिहायड्रेशनमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे जंक फूड खाणं टाळा. जर तुम्हाला गाडी घ्याची असेल तर आजच नियोजन करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget