एक्स्प्लोर

Horoscope Today, July 4, 2022 : मेष ते मीन राशींसाठी कसा असणार आठवड्याचा पहिला दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 4, 2022 : मेष राशीच्या लोकांना परिश्रमानंतरही निर्धारित यश न मिळाल्याने मनात चिंता राहील. वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल.

Horoscope Today, July 4, 2022 : आज मघा नक्षत्र आहे. चंद्र सिंह राशीत आहे. शनी आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य मिथुन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना परिश्रमानंतरही निर्धारित यश न मिळाल्याने मनात चिंता राहील. वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : मन प्रसन्न राहील, पण काही अज्ञात भीतीमुळे त्रास होऊ शकतो. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. अधिक धावपळ होईल. हट्टी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. परिश्रमानंतरही निर्धारित यश न मिळाल्याने मनात चिंता राहील. शारीरिक स्वास्थ्यही कमजोर होईल. प्रवासासाठी वेळ योग्य नाही. विचार न करता काम केल्यास नुकसानच होईल. सरकारी कामात यश मिळेल. आजचा दिवस विशेष यशाचा नाही.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. मनोबल आणि आत्मविश्वास मजबूत होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. सरकारी कामात यश आणि लाभ मिळेल. मुलांच्या मागे पैसा खर्च होईल. कलाकार आणि खेळाडू आपली प्रतिभा सिद्ध करू शकतील. आज प्रॉपर्टीशी संबंधित कोणतेही काम करू नका. गुंतवणुकीबाबत कोणतीही मोठी योजना करू नका. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना आपल्या वर्तनावर संयम ठेवा.

मिथुन (Gemini Horoscope) : दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. भाग्योदयाच्या नव्या संधी येतील. मात्र, सतत बदलणारे विचार तुम्हाला गोंधळात टाकतील. नवीन काम सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी तुमचे संबंध चांगले राहतील. आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांची कामे सहज पूर्ण होतील. व्यापार्‍यांसाठी दिवस चांगला आहे. आज आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही वेळ लाभदायक आहे.

कर्क (Cancer Horoscope) : मनात थोडी निराशा असू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. अहंकारामुळे कोणाच्या तरी भावना दुखावतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. अतिरिक्त पैसा खर्च होईल. असंतोषाच्या भावनेने मन चिंताग्रस्त राहील. कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करू नका. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या आणि निष्काळजी राहू नका.

सिंह (Leo Horoscope) : तुम्ही आत्मविश्वासाने आणि झटपट निर्णय घेऊन कामात पुढे जाण्यास सक्षम असाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. बोलण्यात, वागण्यात आक्रमकता आणि एखाद्याशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील किंवा वडीलधाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळेल. आरोग्याबाबत निष्काळजीपणामुळे चिंता वाढेल. सरकारी कामे लवकर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य आहे.

कन्या (Virgo Horoscope) : शारीरिक अस्वस्थतेसोबतच मानसिक चिंताही वाढेल. डोळे दुखू लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होतील. अतिरेकी आणि अहंकारामुळे एखाद्याशी भांडण किंवा वादाची परिस्थिती उद्भवू शकते. अचानक पैसा खर्च होईल. नोकरी शोधणाऱ्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांपासून सावध राहावे. स्वतःच्या कामात अधिक लक्ष द्यावे. आज कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल.

तूळ (Libra Horoscope) : विविध क्षेत्रात लाभ मिळाल्याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि आनंदी असाल. मित्रांच्या भेटीगाठी होतील, रमणीय ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाईल. गृहस्थ जीवनात सुख-शांती अनुभवास येईल. उत्पन्न वाढेल. वैवाहिक सुख मिळेल. अविवाहित लोकांचे नाते घट्ट होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात नवीन आणि सकारात्मक सुरुवात होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस प्रगतीचा असेल. विचार सकारात्मक ठेवा. व्यवसायाच्या संस्थेचे किंवा कंपनीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे, हे काम वेळेत केले पाहिजे. मान-प्रतिष्ठा वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वडीलधाऱ्यांकडून लाभ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना उधारीचे पैसे मिळतील. मन प्रसन्न राहील. नोकरदार लोकांना काही नवीन काम मिळू शकते. मात्र, दुपारनंतर मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त राहू शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामात उत्साह कमी राहील. मनात थोडी चिंता राहील. मुलांची समस्या यामागे कारण असू शकते. व्यवसाय आणि नोकरीत त्रास होऊ शकतो. कोणाशीही नवीन नातं सुरू करण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. कोणत्याही कामात यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. विरोधक किंवा उच्च अधिकार्‍यांशी वादात पडू नका. आज जोखीम घेणे टाळा.

मकर (Capricorn Horoscope) : नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्यावर होऊ देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक संकटांपासून बचाव होईल. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक एखादा प्रवास घडू शकतो. यासाठी खूप पैसेही खर्च करावे लागतील. कोणत्याही प्रकारचे नवीन संबंध प्रस्थापित करणे फायदेशीर नाही. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या, नाहीतर तब्येत बिघडेल. अचानक आर्थिक लाभही होईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल शकाल आणि त्यांच्यासोबत प्रेमाचे काही क्षण मिळतील. कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. मित्राच्या मदतीने व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल.

मीन (Pisces Horoscope) : दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे कामात यश मिळेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. तुमचा राग तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातून दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी सन्मान मिळेल. विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. आरोग्यात सुधारणा. शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. आज काही अपूर्ण काम पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget