एक्स्प्लोर

Horoscope Today, August 6, 2022 : मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा असणार श्रावणी शनिवारचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 6, 2022 : मेष राशीच्या लोकांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. वृषभ राशीच्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

Horoscope Today, August 6, 2022 : आज विशाखा नक्षत्र आहे. चंद्र सध्या तूळ राशीत असून, दुपारनंतर वृश्चिक राशीत प्रवेश करेल. शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. तर, सूर्य आता कर्क राशीत आहे. मेष राशीच्या लोकांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. वृषभ राशीच्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य

मेष (Aries Horoscope) : आजच्या दिवशी मनात संभ्रम राहील. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती सामान्य राहील. व्यावसायिक कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. आपले काम इतर कोणावरही सोपवू नका. नुकसान करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. नशिबाची साथ मिळेल. काही प्रलंबित कामे आज पूर्ण होतील.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्ही खूप उत्साही असाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही प्रकारचे भांडवल गुंतवताना, नीट विचार करा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. व्यावसायिक कामात यश मिळेल, लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांसोबत वेळ घालवाल. व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्ततेचा असणार आहे. अचानक तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी उच्च अधिकाऱ्यांशी आदराने वागणे आवश्यक आहे. मानसिक तणावाचे शिकार होऊ शकता. शरीरात आळस राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कामाचा ताण जाणवेल. तरीही प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. रोजगाराच्या नवीन संधी मिळतील.

कर्क (Cancer Horoscope) : मानसिक तणाव दूर होईल, मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यामुळे कोणतेही मोठे काम यशस्वीपणे पूर्ण होईल. तुम्हाला उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. विरोधक पराभूत होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. ऑफिसमधील प्रलंबित कामांमुळे तुम्हाला बॉसच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते.

सिंह (Leo Horoscope) : ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमची सर्व कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अधिकारी तुमच्या कृतींचे कौतुक करू शकतात. व्यावसायिक लोकांना अपेक्षित परिणाम मिळू शकतात.  आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यावसायिक कामात शहाणपणाने निर्णय घ्या. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.

कन्या (Virgo Horoscope) : आज नवीन काम सुरू करणे योग्य नाही. आज शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करा, अन्यथा कोणाशी तरी मतभेद होऊ शकतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य मध्यम राहील. आर्थिक आणि कौटुंबिक जीवन यात समतोल ठेवा. आर्थिक समस्या दूर होतील, परंतु घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

तूळ (Libra Horoscope) : कामाच्या ठिकाणी जास्त वाढत्या व्यापामुळे तणाव असू शकतो. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक गणित चुकेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक बाबी गुंतागुंतीच्या होऊ शकतात, भांडवल हुशारीने गुंतवा. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना पदोन्नती मिळेल. कामानिमित्त दूरच्या ठिकाणी जावे लागेल. नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देतील. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद दूर करा.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज सर्व निकाल तुमच्या बाजूने लागतील. कामाच्या ठिकाणी मतभेद होऊ शकतात. दिवस धावपळीत जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कामाचा भार असून, ते वेळेत पूर्ण करण्याचे आव्हानही असेल. आर्थिक स्थिती सुधारेल, अडकलेले पैसेही मिळतील. व्यवसाय क्षेत्रात नवीन करार होऊ शकतो, जो खूप फायदेशीर सिद्ध होईल. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुमचे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक फायदा होईल. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे टार्गेट सहज पूर्ण होईल. समाजात सन्मान मिळेल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, वाहन जपून चालवा. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा जास्त पैसा खर्च होईल. वाणीवर संयम ठेवा. कोणाशीही वाद घालू नका.

मकर (Capricorn Horoscope) : कामाच्या ठिकाणी नवी आव्हाने येऊ शकतात. खर्च जास्त होईल. कामात येणारे अडथळे, आर्थिक समस्या आणखी वाढत जातील. अशा परिस्थितीत मानसिक शांतता राखली तर चांगले होईल. विनाकारण कोणाच्या बोलण्यात अडकू नका. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कुंभ (Aquarius Horoscope) : आपल्या प्रियजनांशी चांगले नातेसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक बाबींमध्ये बाहेरील व्यक्तींना ढवळाढवळ करू देऊ नका. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू देखील मिळू शकतात. ऑफिसमध्ये आज तुमच्या कामाचे खूप कौतुक होऊ शकते. तुम्ही भविष्यातील योजनांवर भांडवल गुंतवू शकता. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळेल.

मीन (Pisces Horoscope) : कोणाशीही वाद घालू नका. आज रागावर संयम ठेवा. धार्मिक गोष्टींमध्ये रस राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. मन अस्वस्थ होऊ शकते. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा, विचार न करता एखाद्याला पैसे देणे टाळा. भांडवल गुंतवताना कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका, अन्यथा नंतर नुकसान सहन करावे लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे, स्पर्धा आणि परीक्षेत यश मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who is Hassan Nasrallah : 80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu : तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी- बच्चू कडूAjit Pawar Pune : पावसामुळे पुणेकरांची अडचण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम रद्द केला-पवारHingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजनMumbai Accident : कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Hassan Nasrallah : 80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
Madhya Pradesh : उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले
उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले
Sanjay Raut : मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान; पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरुन संजय राऊतांची टीका
मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान; पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरुन संजय राऊतांची टीका
बदलापूरच्या 'त्या' शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात, सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून...
बदलापूरच्या 'त्या' शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात, सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून...
Sharad Pawar: हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध; आयात उमेदवार नको म्हणत केला विरोध, शरद पवासांसमोर मोठा पेच?
हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध; आयात उमेदवार नको म्हणत केला विरोध, शरद पवासांसमोर मोठा पेच?
Embed widget