Horoscope Today, August 5, 2022 : कर्क, मकरसह ‘या’ राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, August 5, 2022 : मेष राशीच्या लोकांनी नुकसान करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. वृषभ राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील.

Horoscope Today, August 5, 2022 : आज चंद्र चित्रा नक्षत्रात असून तूळ राशीत आहे. सूर्य कर्क राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांनी नुकसान करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. वृषभ राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : लोकांशी संवाद साधताना खूप काळजी घ्या. कुटुंब आणि मित्रांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. नवीन कपडे आणि दागिने खरेदी करण्याचे योग आहेत. सामाजिकदृष्ट्या तुम्हाला मान-सन्मान मिळेल. दुपारनंतर संयमाने वागावे लागेल. नवीन नातं बनवण्यापूर्वी नीट विचार करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. नुकसान करणाऱ्या लोकांपासून सावध रहा.
वृषभ (Taurus Horoscope) : राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. काही कायदेशीर कामात तुम्हाला विजय मिळू शकेल. घरातील वडिलधाऱ्यांची तब्येत बिघडेल. भावंडांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे घरात तणावाचे वातावरण राहील. आज तुमच्यासमोर विरोधकही पराभूत होतील. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील.
मिथुन (Gemini Horoscope) : संभाषणात संयम ठेवा. नोकरीत प्रवासाची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. अज्ञात भीतीने तुम्ही त्रस्त होऊ शकता. मन चंचल राहील. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. घाई घाईत सुरू केलेल्या कोणत्याही कामामुळे नुकसान होऊ शकते. वादविवादात बदनामी होण्याची शक्यता आहे. खर्च करताना आपल्या आर्थिक बाजूचा विचार करा.
कर्क (Cancer Horoscope) : व्यवसायात नुकसान होऊ शकते. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता वाटू शकते. यामुळे तुम्हाला कोणत्याही कामातही रस वाटणार नाही. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. सहकारी किंवा कुटुंबातील सदस्यांशी मतभेद आणि भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी बदनामी होण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा असेल. आज तुम्हाला एखादी भेटवस्तू किंवा सन्मान मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद होईल. मुलांनी सामाजिक कार्य केल्याने तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटाल. मित्रांसोबत पार्टी आयोजित करू शकता. दिवस आनंदात जाईल. कामाचा व्याप काही प्रमाणात वाडू शकतो.
कन्या (Virgo Horoscope) : बोलण्यात संयम बाळगा. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. अधिक धावपळ होईल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या गोड आवाजाने तुम्ही कोणाचेही मन जिंकू शकता. तुहातातील कामे यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra Horoscope) : मन प्रसन्न राहील. संयम वाढेल. घरातील जेष्ठांच्या तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. व्यवसायात वाढ होईल. अनावश्यक राग टाळा. आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. लाभाच्या संधी मिळतील. उत्पन्न वाढेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभ होईल. प्रिय व्यक्तीशी भेट आणि कामात यश मिळण्याचे योग आहेत.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : परदेशात राहणाऱ्या तुमच्या प्रिय व्यक्ती किंवा मित्रांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. कार्यालयातील सहकाऱ्यांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ लाभदायक आहे. तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करावे लागेल, कारण त्या हरवण्याचा आणि चोरीला जाण्याचा धोका आहे. जोडीदाराची साथ मिळाल्याने अनेक समस्या दूर होतील.
धनु (Sagittarius Horoscope) : नोकरी आणि व्यवसायात चांगली बातमी मिळेल. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाल्याने कौटुंबिक जीवनातही आनंद आणि समाधानाचा अनुभव येईल. व्यवसायात उत्पन्न आणि नफा वाढेल. प्रिय व्यक्तीसोबत आनंददायी क्षणांचा अनुभव घ्याल. मित्रांसोबत एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांसाठी स्थळ येऊ शकते.
मकर (Capricorn Horoscope) : अनावश्यक राग टाळा, शांत व्हा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्च जास्त होईल. आत्मविश्वास भरपूर असेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नोकरीत अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. पदोन्नतीची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius Horoscope) : कामात उत्साह कमी राहील. कार्यालयात उच्च अधिकार्यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. विरोधकांसोबत कोणत्याही वादात अडकू नका. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अर्थपूर्ण असेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध दृढ होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च जास्त होईल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कामाचा व्याप वाढेल.
मीन (Pisces Horoscope) : काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे खर्च वाढेल. कामात काही अडचण येऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद आणि वाद होऊ शकतात. मात्र, अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमच्या काही अडचणी दूर होतील. धार्मिक आणि अध्यात्मिक कामांमुळे मानसिक शांतीचा अनुभव घेऊ शकाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
