एक्स्प्लोर

Horoscope Today, August 24, 2022 : मेष ते मीन राशींसाठी कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 24,  2022 : मेष राशीच्या व्यवसायिकांना आर्थिक फायदा होईल. तर, वृषभ राशीच्या लोकांना अडकलेला पैसा परत मिळेल.

Horoscope Today, August 24,  2022 : आज पुनर्वसु नक्षत्र आहे. चंद्र कर्क राशीत प्रवेश करत आहे. आज शनि मकर राशीत आणि सूर्य सिंह राशीत आहे. तर, गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या व्यवसायिकांना आर्थिक फायदा होईल. तर, वृषभ राशीच्या लोकांना अडकलेला पैसा परत मिळेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस नेहमीपेक्षा उत्तम जाईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला आहे, अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम अडकून पडू शकते. बोलण्यावर संयम ठेवा, अनावश्यक वादात पडू नका. अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृषभ (Taurus Horoscope) : व्यवसायात अडकलेला पैसा परत मिळेल. नोकरीत प्रगती होईल. बौद्धिक कार्यातून उत्पन्न वाढेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कामाचा व्यापही वाढेल. जुन्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला फायदा होईल. शरीरात उत्साह राहील, मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, मान-सन्मान वाढेल.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. छोटे व्यापारी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतील आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांना नियंत्रणात ठेवतील. अचानक काही फायदा होऊ शकतो. जर, तुम्ही एखाद्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला, तर तो तुमचा विश्वासघात करू शकतो. कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडल्याने धावपळ होईल.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कौटुंबिक कामात पैसा खर्च होईल. उद्यासाठी कोणतेही काम पुढे ढकलणे टाळा. संयम कमी होईल. बोलण्यावर संयम ठेवा. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. वडिलांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. घरामध्ये मंगल कार्याचे आयोजन करता येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीसाठी कुठेतरी बाहेरगावी जावे लागेल. तुम्ही पालकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करा, अन्यथा ते तुमच्यावर रागावतील. आज तुम्ही ज्याला भेटाल तो तुमच्यामुळे प्रभावित होईल. कोणाशीही बोलत असताना शब्दांवर संयम ठेवा. लाभाच्या संधी मिळतील.

कन्या (Virgo Horoscope) : मन शांत राहील. आत्मविश्वासाने दिवस चांगला जाईल. वैवाहिक सुखात वाढ होईल. खर्चाच्या अतिरेकामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. अधिक धावपळ होईल. शैक्षणिक कार्यासाठी प्रवास घडू शकतो. एखाद्या राजकारण्याला भेटू शकता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. कुटुंबाकडून तुम्हाला भावनिक बळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल, भूतकाळात रखडलेल्या आर्थिक योजनांचा विचार करूनच भांडवल गुंतवा, अन्यथा नंतर त्रास सहन करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. संयमाने काम करा. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. विद्यार्थ्यांना यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रशासनाकडून एखादी मदत केली जाईल. चांगली गोष्ट घडल्यामुळे आनंद वाढेल. आज तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्चही वाढतील. कामाच्या ठिकाणी सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. उच्च अधिकारी प्रोत्साहन देतील.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस आनंददायी जाईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या, घाईघाईने घेतलेले निर्णय त्रासदायक ठरू शकतात. जर, तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर दिवस शुभ आहे. कुटुंबात सुरू असलेला तणाव संपेल, परस्पर विश्वास वाढेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.

मकर (Capricorn Horoscope) : काही चांगल्या लोकांशी संपर्क होईल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. उधार पैशांच्या व्यवहारामुळे नंतर तुमच्या परस्पर संबंधात तेढ निर्माण होऊ शकतात. भविष्य उज्वल बनवण्यासाठी सुवर्णसंधी मिळतील. हाती घेतलेल्या कामात यश नक्कीच मिळेल, पण या कामाकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील.

कुंभ (Aquarius Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस कठीण असू शकतो. कामाच्या ठिकाणी आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. व्यापारी वर्गाला कामात अडथळे येतील, संयम ठेवून काम करा. अनावश्यक खर्च वाढतील. कामानिमित्त प्रवास करू शकता. आज नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.

मीन (Pisces Horoscope) : आज लांबच्या प्रवासाला जाणार असाल, तर ही योजना सध्या पुढे ढकला. कोणाशीही वाद घालू नका. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. रागाचा अतिरेक होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या क्षेत्रातील व्यक्तीच्या मदतीने तुम्ही आर्थिक नफा कमवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. विनाकारण वादात पडू नका, रागावर संयम ठेवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget