Horoscope Today, August 21, 2022 : मेष ते मीन राशींसाठी कसा असेल रविवारचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, August 21, 2022 : मेष राशीच्या लोकांना इतरांना मदत केल्याने आनंद मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळेल.
Horoscope Today, August 21, 2022 : आज मृगशीर्ष नक्षत्र असून, चंद्र वृषभ राशीत आहे. संध्याकाळनंतर चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना इतरांना मदत केल्याने आनंद मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. मात्र, हा बदल तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुमच्या वागण्याने वातावरण हलके करू शकाल. इतरांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. त्यामुळे आजचा दिवस परोपकारात जाईल. आज खूप पैसा खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक खर्च करण्याचा प्रयत्न करा. एखाद्याशी आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा.
वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी जाईल. पैसा आणि करिअरच्या बाबतीतही आजचा दिवस सामान्य असेल. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याबाबत जागरुक असणं खूप गरजेचं आहे. शुभ कार्यात सहभाग घेतल्याने तुमचा सन्मान वाढेल. जर तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्य तुमच्यावर रागावले असतील, तर तुम्हाला त्यांची माफी मागण्याचा प्रयत्न करावा लागेल.
मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. तुमच्या कुटुंबातील एखाद्या शुभ कार्यक्रमाच्या आयोजनामुळे घरात पाहुणे येत राहतील. कोणत्याही सरकारी योजनेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभही तुम्हाला मिळू शकतो. अधिकारीही तुमच्या कामावर खूश होतील. भविष्यासाठी बिझनेस प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी चांगले राहील, नंतर तुम्हाला याचा चांगला नफा मिळू शकेल.
कर्क (Cancer Horoscope) : आज तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. व्यवसायात यश मिळेल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने आनंद होईल. तुमचे वर्चस्व आणि प्रभाव वाढेल. सरकारी कामात लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. मानसिक आरोग्या चांगले असल्यामुळे मन प्रफुल्लित राहील. घरगुती जीवनात आनंद राहील. कौटुंबिक गरजांवर पैसा खर्च करून आनंद मिळेल. घरासाठी एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्याल.
सिंह (Leo Horoscope) : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राजकारणात यश मिळवून देणारा असेल. मुलांप्रतीची जबाबदारीही पार पाडाल. स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाता येईल. रखडलेली कामेही पूर्ण होतील. व्यावसायिक प्रकल्पांमध्येही भरपूर पैसे गुंतवाल. जर, तुम्ही सहलीला जाण्याची तयारी करत असाल, तर तुम्हाला त्याचा पुरेपूर आनंद मिळेल. सामाजिक कार्यातही पैसा खर्च होऊ शकतो. मित्रांकडून लाभ होईल.
कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. मित्र आणि प्रियजनांसोबत तुमचा वेळ आनंददायी असेल. धार्मिक कार्यासाठी बाहेर जावे लागेल. सामाजिक कार्यात पैसा खर्च होऊ शकतो. मित्रांकडून लाभ मिळेल. परदेशात राहणाऱ्या कोणत्याही मित्राची किंवा प्रिय व्यक्तीची एखादी चांगली बातमी कळल्याने तुम्हाला आनंद होईल. भाऊ-बहिणींकडून लाभ होईल. तुमच्या हातात पुरेसा पैसा असेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.
तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष फलदायी असेल. तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तो तुम्हाला भविष्यात चांगली गुंतवणूक देऊ शकेल. रिकामा वेळ वाया घालवू नका. या वेळात व्यवसायाचे नियोजन करून नफा कमवण्यावर भर द्यावा लागेल. विवाहितांना आणखी काही दिवस संयम ठेवावा लागेल, तरच त्यांना चांगला जोडीदार मिळू शकेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमची आर्थिक बाजू मजबूत करणारा असेल. यासोबतच आज तुमची कीर्ती, आदर आणि प्रसिद्धीमध्येही वाढ होईल. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. वाणीवर संयम न ठेवल्याने तुम्हाला प्रतिकूलतेला सामोरे जावे लागू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनात गोडवा येईल.
धनु (Sagittarius Horoscope) : कौटुंबिक जीवन आज आनंदी राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढून, तुमचे उत्पन्न वाढेल आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. तुमची कमतरता कोणाच्याही समोर येऊ देऊ नका, नाहीतर लोकं त्याचा पुरेपूर फायदा घेतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन अधिकार सोपवले जातील. तुमचा तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांपैकी कोणाशी वाद सौ असले, तर तो आज संपेल.
मकर (Capricorn Horoscope) : आज तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात अनुकूल लाभ मिळाल्याने आनंद होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. सध्या, तुमची व्यवसाय परिवर्तन योजना सुरू आहे. संध्याकाळी, धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना कराल, जी शेवटी पुढे ढकलली जाईल. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा, वाहनाचे अपघाती नुकसान होऊन खर्च वाढू शकतो.
कुंभ (Aquarius Horoscope) : तुमच्या मनातील भीती आणि आळस यामुळे तुम्हाला निराश वाटेल. कामात तुमची गती खूप कमी असेल. व्यवसायात लाभासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागू शकतो. कुटुंबात वाद आणि जवळच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची चिंता राहील. जनमानसातील तुमच्या प्रतिष्ठेला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
मीन (Pisces Horoscope) : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. व्यवसायातील वाढत्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी असाल. विद्यार्थ्यांचा मानसिक आणि बौद्धिक भार दूर होईल. संध्याकाळी फिरताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुमचे मनही शांत होईल. पालकांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयुक्त ठरतील. योग्य निर्णय घेऊ शकाल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ