एक्स्प्लोर

Horoscope Today, August 12, 2022 : काहींना मिळणार पदोन्नती, तर काहींना चांगली नोकरी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 12,  2022 : मेष राशीचे लोक नवीन व्यावसायिक योजना आखू शकतात. वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो.

Horoscope Today, August 12,  2022 : आज चंद्र मकर राशीत असून, धनिष्ठा नक्षत्र आहे. सूर्य कर्क राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. मेष राशीचे लोक नवीन व्यावसायिक योजना आखू शकतात. वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : काही नवीन व्यावसायिक योजना करू शकतात. भागीदारीतून मोठा फायदा होऊ शकतो. नवीन संपर्क देखील स्थापित कराल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. आज कामात चांगला नफा मिळेल. मात्र, अत्याधिक खर्चांमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दैनंदिन कामांसाठी पैशांची कमतरता जाणवेल. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विनाकारण वादात पडू नका, रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ (Taurus Horoscope) : कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे तणाव येऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. अतिरिक्त खर्चामुळे मासिक बजेटमध्ये गडबड होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक बाबी गुंतागुंतीच्या होऊ शकतात, भांडवल विचार करूनच गुंतवा. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायातही उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते. वडील आणि वडीलधाऱ्यांकडून लाभ मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्टसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाचा विचार करू शकता. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने तुम्हाला आनंद वाटेल. अनैतिक कृत्ये अडचणीत आणू शकतात. एखाद्या सुंदर ठिकाणी फिरण्याची योजना आखू शकता. दुपारनंतर काही चांगली बातमी मिळू शकते. कोणतीही जुनी चिंता दूर होऊ शकते.

कर्क (Cancer Horoscope) : नोकरीत असलेले लोक एखाद्या पार्ट टाईम कामात हात आजमावू शकतात. कुटुंबात सुरू असलेले वाद संपतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येतील. परंतु, तुम्हाला वेळेचा सदुपयोग करून तुमची कामे वेळेतच पूर्ण करावी लागतील. ऑफिसमध्ये तुमची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या गोष्टी सुरळीत होतील आणि तुमची चांगली प्रगती होईल. उत्पन्न वाढेल आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo Horoscope) : आज दिवसाची सुरुवात त्रासदायक असू शकते, परंतु जसजसा दिवस जाईल तसतशी परिस्थिती सुधारेल. कार्यक्षेत्रात काही कठीण आणि अवघड प्रसंगांना सामोरे जावे लागेल. परंतु, सहकाऱ्यांच्या मदतीने कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आहाराकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक स्थिती सामान्य राहील, पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. खर्च वाढू शकतो.

कन्या (Virgo Horoscope) : विरोधकांवर विजय मिळेल. जोडीदारासोबत असलेले जुने मतभेद दूर होतील. प्रेम जीवनात समाधान मिळेल. येणारी वेळ लाभदायक ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील. मान-सन्मान मिळेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. व्यावसायिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक काम वेळेवर होईल. आज तुम्हाला विशेष सन्मान मिळेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार योजनांमध्ये फेरबदल करता येईल. लाभाची शक्यता निर्माण होत आहे. शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : अतिउत्साहामध्ये कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. धन हानीचे योग आहेत. प्रेमप्रकरणात असंतोषाची भावना राहील. काही आर्थिक समस्या सुटतील, त्यामुळे मन प्रसन्न राहील. शरीरात नवी ऊर्जा येईल. कार्यक्षेत्रात पूर्ण उत्साहाने सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. जुन्या आर्थिक गुंतवणुकीचा लाभ मिळेल. व्यावसायिक योजना सफल होतील. लाभाच्या संधी मिळतील. बेरोजगारांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्ही थोडे प्रॅक्टिकल असाल. याचा तुम्हाला फायदा होईल. सामाजिकदृष्ट्याही खूप सक्रिय व्हाल. भावनिकदृष्ट्या उत्साहित असाल. तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि आज इतरांवरही विश्वास टाकाल. तुमच्या मनात काही नवीन कल्पना येतील. आज केलेले काम कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होईल. घरगुती जीवनात आनंदाचे वातावरण राहील. अध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढेल.

मकर (Capricorn Horoscope) : आर्थिक स्थिती मजबूत राहील. कार्यक्षेत्रात कोणत्याही नवीन बदलासाठी तयार राहा. कामात व्याप आणि गांभीर्य वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. बेरोजगारांना कोणत्याही चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकते. करिअरशी संबंधित अडचणी दूर होतील. आज तुम्हाला विविध स्त्रोतांकडून लाभ मिळू शकतात. काही महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आर्थिक जीवन आणि वैयक्तिक जीवन यात समतोल असू द्या. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचा आणि क्षमतेचा आदर केला जाईल. पदोन्नती होऊ शकते. काही प्रमाणात आर्थिक समस्या दूर होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाने घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना बढती मिळू शकते.

मीन (Pisces Horoscope) : आज नशीब तुमच्या सोबत आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा देऊ शकते. केलेल्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता आहे. सध्याच्या नोकरीतच अतिरिक्त जबाबदारी किंवा काम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, तुमच्या मनात एखाद्या गोष्टीची चिंता असेल. कामानिमित्त प्रवास करू शकता. व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

महत्त्वाच्या बातम्या

Datta Jayanti 2026: दत्त जयंती येतेय..कधी आहे दत्त जयंती? गुरूचरित्र सप्ताह कधीपासून? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा
दत्त जयंती येतेय..कधी आहे दत्त जयंती? गुरूचरित्र सप्ताह कधीपासून? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा
Shani Dev: 2027 वर्ष येण्यापूर्वीच शनिचं 4 राशींना मोठं सरप्राईझ, शनिची मार्गी चाल प्रगतीचा मार्ग मोकळा करणार, नववर्षात पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल
2027 वर्ष येण्यापूर्वीच शनिचं 4 राशींना मोठं सरप्राईझ, शनिची मार्गी चाल प्रगतीचा मार्ग मोकळा करणार, नववर्षात पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल
Horoscope Today : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीबाचा गेम पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीबाचा गेम पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Embed widget