Horoscope Today, April 7, 2022 : ‘या’ राशींसाठी गुरुवारचा दिवस ठरणार लाभदायी! जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Horoscope Today 2 April 2022 : आज मृगाशिरा नक्षत्र आणि चंद्र वृषभ राशीत आहे. सकाळी 09:11 नंतर चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. बुध सूर्यासोबत गुरूच्या वर्चस्व असलेल्या मीन राशीत आहे.
Horoscope Today 2 April 2022 : आज मृगाशिरा नक्षत्र आणि चंद्र वृषभ राशीत आहे. सकाळी 09:11 नंतर चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. बुध सूर्यासोबत गुरूच्या वर्चस्व असलेल्या मीन राशीत आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती तशीच राहील. आज मेष आणि कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. कन्या आणि मकर राशीच्या तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकरीत नवीन संधी मिळतील. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी वाहन चालवताना निष्काळजीपणा दाखवला नाही तर उत्तम! चला तर जाणून घेऊया आजचे सविस्तर राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण जाईल. मुलांच्या बाजूने काही निराशाजनक बातम्या देखील ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमचे मन दु:खी होईल. आपली कामे लोकांकडून सहज करून घ्या. यश मिळेल. आज जर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा करत असाल, तर तो त्या पूर्ण करेल. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबातील सदस्यांसाठीही वेळ काढाल, त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना परीक्षा, अभ्यास इत्यादींमध्ये यश मिळेल.
वृषभ (Taurus Horoscope) : कार्यक्षेत्रात लाभ होईल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. लोकांमध्ये सन्मान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल. प्रमोशनही होऊ शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी शांततापूर्ण असेल. वादाची परिस्थिती उद्भवली असेल, तर तुम्ही तुमच्या शांत स्वभावामुळे ती सोडवू शकाल. राजकारणात हात आजमावत आहेत, त्यांना आज यश नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांना आज वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल, तरच त्यांच्या परीक्षेत यश मिळेल. संध्याकाळी काही लोकांच्या भेटीमुळे तुम्हाला अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. काही शत्रूंपासून सावध राहावे लागेल, कारण ते तुमच्या मौल्यवान वस्तू चोरू शकतात. व्यवसायातील काही योजना दीर्घकाळ प्रलंबित असतील, तर आज त्यांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या संशोधन प्रकल्पावर काम करू शकता. प्रिय व्यक्तीसमोर भावना व्यक्त करण्यात काही अडचण येऊ शकते.
कर्क (Cancer Horoscope) : प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कामात सहकार्य लाभेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. प्रगतीसाठी मेहनत करा. आजचा दिवस तुमच्यासाठी धनसंपत्तीचे शुभ संकेत देत आहे. घर, दुकान इत्यादी खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. प्रवास फायदेशीर ठरेल. नोकरीच्या क्षेत्रात अथक प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळताना दिसेल. कुटुंबाकडून काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. इतर कोणालाही पैसे देणे टाळा. अन्यथा ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. उत्पन्नाचे काही नवीन साधन मिळेल. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असतील, तर त्यांना यश नक्कीच मिळेल. आईच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. दिवस पैशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असेल. मन प्रसन्न राहील. हुशारी दाखवल्याने कार्यात यश मिळेल. जास्त रागाने त्रास वाढेल.
कन्या (Virgo Horoscope) : आज नशीब पूर्ण साथ देणार नाही. कोर्ट-कचेरीशी संबंधित काही प्रकरणे असतील, तर त्यामध्ये थोडा दिलासा मिळेल. हुशारी दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण कराल. मुलांना नवीन नोकरीबद्दल माहिती मिळू शकते, ज्यामध्ये त्यांना प्रमोशन देखील मिळू शकते, जे तुमच्या आनंदाचे कारण ठरेल. काही पैसे दानधर्मासाठी किंवा गरिबांच्या सेवेसाठी दान कराल. रोजगाराच्या शोधात असलेल्या लोकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल, तरच त्यांना चांगली ऑफर मिळू शकेल.
तूळ (Libra Horoscope) : आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन लोकांना भेटताना दिसतील. व्यवसायासाठी जवळ किंवा दूरचा प्रवास करायचा असेल, तर नक्की जा. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या व्यवहारातील कोणतीही मोठी समस्या संपुष्टात येईल. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. कुटुंबातील तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : अधिकाऱ्यांची विशेष ओळख होईल. दुसऱ्याला दिलेले पैसे मिळू शकतात. अनावश्यक खर्चात कपात करा. जोडीदारासोबत काही नवीन नियोजन कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी काही आरोग्याच्या समस्या घेऊन येईल. आधीच एखादा आजार असेल, तर आज तुमचा त्रास वाढू शकतो. दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळतील. अविवाहित लोकांसाठी चांगले वैवाहिक प्रस्ताव येतील. कर्ज घेणे टाळा.
धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. विरोधक देखील प्रशंसा करताना दिसतील. सासरच्या मंडळींकडून पैशांसंबंधी काही माहिती ऐकायला मिळू शकते. संध्याकाळी तुम्ही कोणत्याही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रगती पाहून, तुम्हाला पार्टीचे आयोजन करावे लागेल. आज एखादी शुभवार्ता मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
मकर (Capricorn Horoscope) : राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि ध्यास मनात दिसून येईल. खाद्यपदार्थ व्यापार्यांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. आजचा दिवस सामान्य असणार आहे. कौटुंबिक आणि आर्थिक बाबी सोडवण्यासाठी तुम्ही कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि भावांची मदत घेऊ शकता. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न निश्चित झाल्यामुळे आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संकटांनी भरलेला असेल. तुमच्या आनंदावर विरजण पडू शकते. व्यवसायात शत्रूंमुळे त्रास होईल आणि तुम्हाला अपेक्षित काम मिळणार नाही. परंतु, घाबरून जाण्याची गरज नाही. अचानक प्रवासाला जावे लागेल. अशावेळी नक्कीच कोणालातरी सोबत घ्या. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवणे टाळा. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या समस्यांवर उपाय मिळतील. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील, पण मनात भीती राहील. शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल.
मीन (Pisces Horoscope) : छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणे टाळा. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखल्या पाहिजेत. मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. नात्यात काही नवीन ताजेपणा अनुभवायला मिळेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. वाढत्या खर्चावर लगाम घालावा लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणीला सामोरे जावे लागू शकते. धार्मिक पुण्य कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. पैशाचे व्यवहार तुमच्यासाठी चिंतेचे कारण ठरतील. कुटुंबातील सदस्यांकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
- Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या जोडप्यांना अनेक समस्यांचा करावा लागतो सामना
- Taurus Monthly Horoscope (1 एप्रिल ते 30 एप्रिल) : कसा असेल वृषभ राशीसाठी एप्रिल महिना
- Virgo Monthly Horoscope : कन्या राशीच्या लोकांना मिळू शकते पदोन्नती, टूर-प्रवासाशी संबंधित नोकरी आणि व्यवसायातील लोकांनादेखील होईल उत्तम फायदा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha