एक्स्प्लोर

Horoscope Today, April 18, 2022 : ‘या’ राशींचा होणार भाग्योदय! जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today, April 18, 2022 : मेष, तूळ आणि कन्या राशीला ग्रहसंक्रमणाचा जास्तीत जास्त फायदा होईल. कर्क आणि सिंह राशीचे लोक आज राजकारणात यशस्वी होतील.

Horoscope Today April 18, 2022: आज वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी चंद्र विशाखा नक्षत्रात आणि सूर्योदयाच्या वेळी तूळ राशीत आहे. गुरू मीन राशीत आहे आणि सूर्य व मंगळ मेष राशीत आहेत. उर्वरित ग्रहांची स्थिती सारखीच आहे. मेष, तूळ आणि कन्या राशीला ग्रहसंक्रमणाचा जास्तीत जास्त फायदा होईल. कर्क आणि सिंह राशीचे लोक आज राजकारणात यशस्वी होतील. जाणून घेऊया आजचे सविस्तर राशीभविष्य...      

मेष (Aries Horoscope) : प्रवास फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसे मिळतील. व्यापार-व्यवसायानुसार लाभ होईल. नोकरीत प्रशंसा मिळेल. घाईमुळे काम बिघडू शकते. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी योजना आखली जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला असेल, परंतु कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्‍यांशी भांडण झाले तरी शांत राहावे. मित्रांसोबत पार्टी आयोजित करू शकता. चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. छोट्या व्यावसायिकांना अधिक परिश्रम करावे लागतील. तुम्ही काही नवीन योजना शोधत असाल, तर अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. पदोन्नती मिळू शकते. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून फायदा होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. एखादे मोठे काम करताना आनंद मिळेल..

मिथुन (Gemini Horoscope) : पार्टी आणि पिकनिकचा कार्यक्रम होईल. आनंदात वेळ जाईल. आवडत्या पदार्थांचा लाभ मिळेल. रचनात्मक कार्यात यश मिळेल. व्यवसायात भरपूर नफा मिळेल. नोकरीत प्रभाव वाढेल. कोणाशी वाद होऊ शकतो. एखादा छोटासा व्यवसाय करत असाल, तर त्यात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास बरे होईल. तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत घालवाल. भावंडांच्या नात्यात काही दुरावा निर्माण होत असेल, तर तो कमी करावा लागेल. कुटुंबातील लहान मुले तुमच्याकडून काहीतरी मागू शकतात.

कर्क (Cancer Horoscope) : सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी राहील आणि तुमची विश्वासार्हता सर्वत्र पसरेल. मित्रासोबत काही वेळ एकांतात घालवाल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्रस्त व्हाल. कामाचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींबाबत वरिष्ठांशी बोलावे लागेल, तरच यश मिळेल.  आरोग्य कमजोर राहील, काळजी घ्या. वाईट बातमी येऊ शकते. अधिक धावपळ होईल. मेहनत जास्त असेल. नफ्यात कमतरता असू शकते. मौल्यवान वस्तू सोबत ठेवा.

सिंह (Leo Horoscope) : नोकरीत कामाचे कौतुक होईल. कायमस्वरूपी मालमत्तेचे काम मोठे फायदे देऊ शकतात. पदोन्नतीचे प्रयत्न यशस्वी होतील. शारीरिक त्रास संभवतो. संभ्रम निर्माण होऊ शकतो. हुशारीने वागा. दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. जर, जोडीदाराला आधीच आजार असेल तर आज त्यांचा त्रास वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे काही नवीन शत्रूही असतील, जे तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील. अनावश्यक खर्चामुळे अस्वस्थ राहाल.

कन्या (Virgo Horoscope) : आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. कुटुंबात कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, तर धीर धरावा लागेल. तुमच्या वागण्याने कुटुंबातील सर्व सदस्य त्रस्त होतील. तुम्ही तुमच्या पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जाऊ शकता, ज्यामुळे त्यांचे मन प्रसन्न होईल. बालपणीच्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता राहील. उपासनेत रुची राहील. सत्संगाचा लाभ मिळेल. राजकीय अडथळे दूर होऊन लाभाची स्थिती निर्माण होईल. व्यापार-व्यवसायात फायदा होईल.

तूळ (Libra Horoscope) : दुखापत व अपघातामुळे मोठे नुकसान होऊ शकते. जुना आजार पुन्हा होऊ शकतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी वाद होऊ शकतो. स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. मौल्यवान वस्तू सोबत ठेवा. आजचा दिवस महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी सल्लामसलत करायची असेल तर नक्कीच करा. वेळेवर योग्य उपाय न मिळाल्यास तुमच्या मनात अशांतता निर्माण होईल. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली संधी मिळू शकते. इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना काही धार्मिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. भावांसोबत सुरू असलेल्या वादामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. मुलाच्या बाजूने तुम्हाला अचानक काही चांगली माहिती मिळू शकते. जुन्या साथीदारांशी भेट होईल. अनावश्यक खर्च होईल. आरोग्य कमजोर राहू शकते. भावांची साथ मिळेल. व्यवसायात फायदा होईल.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुम्हाला अचानक लाभ देणारा असेल. दैनंदिन व्यवहारात कोणताही संकोच नसावा. आज तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांबद्दल तुम्ही त्यांच्या शिक्षकांशी बोलू शकता. सामाजिक कार्यात रस घ्याल. तुम्हाला सन्मान मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. धोका पत्करण्याची हिंमत असेल. गुंतवणूक चांगली होईल. नोकरीत अधिकारी आनंदी राहतील. शत्रू आणि मत्सरी व्यक्तींपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मकर (Capricorn Horoscope) : दुष्ट लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. फालतू खर्चावर नियंत्रण राहणार नाही. अपेक्षित कामाला विलंब होईल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. लाभाच्या संधी मिळतील. विवेक वापरा. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा सर्वत्र पसरेल आणि तुम्ही दिलेल्या सूचनांचे स्वागत होईल, त्यामुळे तुमचे मनही प्रसन्न राहील. तुमच्या घरी अचानक पाहुणे आल्याने खर्च वाढू शकतो. पराक्रमात वाढ होईल आणि शत्रूंचे मनोधैर्य खचून जाईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : नवीन संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. जमीन, वाहन, घर, दुकान इत्यादी खरेदी करायची असेल, तर तुमची इच्छा पूर्ण होईल. मनातील समाधान कायम ठेवावे लागेल. घरासाठी काही आवश्यक वस्तू देखील खरेदी करू शकता. जोडीदारासाठी भेटवस्तू आणू शकता, यामुळे तुमच्या दोघांमधील प्रेम आणखी वाढेल. व्यवसायात काही बदल करायचे असतील, तर त्यासाठी दिवस चांगला जाईल. सगळ्यांचे सहकार्य मिळेल. सरकारी काम होईल. घरात सुख-शांती नांदेल. व्यावसायिक करार होऊ शकतात. लाभाच्या संधी येतील. भागीदारांचे सहकार्य मिळेल. अडचणीत येऊ नका.

मीन (Pisces Horoscope) : सामाजिक कार्यात रस घ्याल. योजना प्रत्यक्षात येईल. कामाच्या ठिकाणी बदल घडू शकतात. व्यवसायात अनुकूल नफा मिळेल. नोकरीत अधिकार वाढू शकतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून फायदा होईल. उत्पन्न वाढेल. तुम्हाला सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यांना त्यात विजय मिळू शकतो. नोकरीशी संबंधित विद्यार्थ्यांना काही विशेष यश मिळू शकते. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडून आज काही चांगली माहिती ऐकायला मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Embed widget