एक्स्प्लोर

Horoscope 1 April 2022 : ‘या’ राशींसाठी महिन्याचा पहिलाच दिवस ठरणार खास! जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today 1 April 2022 : मीन आणि तूळ राशीच्या लोकांना आज चंद्र लाभ देईल. मेष आणि मकर राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल.

Horoscope Today 1 April 2022 : आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात आणि मीन राशीत आहे. बुध सध्या कुंभ राशीत गुरुसोबत आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती देखील सारखीच आहे. मीन राशीमध्ये आज सूर्य आणि चंद्र एकत्र असतील. मीन आणि तूळ राशीच्या लोकांना आज चंद्र लाभ देईल. मेष आणि मकर राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल. मीन आणि कर्क राशीचे लोक राजकारणात यशस्वी होतील. चला आता जाणून घेऊया आजचे सविस्तर राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आवश्यक काम आधी करा, यश मिळेल. वास्तव लक्षात घेऊन आर्थिक योजना करा. मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करू शकतो.  आज काही अज्ञात भीती तुमच्या मनात राहील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक फायदा होऊ शकतो. सहलीला जाण्याची तयारी करत असाल, तर तुम्हाला ते काही काळ पुढे ढकलावे लागेल. नात्यात काही मतभेद होऊ शकतात. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल.

वृषभ (Taurus Horoscope) : दिवसभर तुमचे शरीर आणि मन आनंदी व प्रफुल्लित राहील. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. यशासाठी सर्व जोखीम पत्करण्याची तयारी ठेवा. लव्ह लाईफमध्ये लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या पालकांना दिलेली वचने पूर्ण करावी लागतील, अन्यथा ते तुमच्यावर रागावतील. कुटुंबातील सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर कराल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असेल. प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जोडीदाराला खरेदीसाठी कुठेतरी घेऊन जाऊ शकता. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षित लाभ मिळतील. काम पूर्ण झाल्यामुळे आनंदी व्हाल. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस थोडा कठीण जाईल. कार्यक्षेत्रात तुमच्यासमोर संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त राहावे लागेल. आई-वडिलांना देव दर्शनाच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता. कामाच्या विस्तारासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. पैशाच्या बाबतीत यश मिळू शकते. चांगल्या वागण्याने लोकांना आकर्षित कराल.

सिंह (Leo Horoscope) :  आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असेल. कुटुंबातील लोकांशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर रागावू शकतो. दिर्घकाळापासून राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. अनेक बाबतीत नशिबाची साथ मिळेल. स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत राहा. कमाईचे नवीन मार्ग दिसतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. अविवाहितांना विवाह योग आहेत.

कन्या (Virgo Horoscope) : महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. कोणतीही नवीन कल्पना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. मालमत्तेची खरेदी आणि विक्री होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आज मजबूत असाल. मात्र, शत्रू त्रास देऊ शकतो, ज्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल.

तूळ (Libra Horoscope) : भूतकाळातील एखाद्या चुकीबद्दल पश्चाताप होईल, यासाठी तुम्ही माफी देखील मागू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत होईल आणि अधिकारीही तुमच्यावर खुश राहतील. नोकरीत यश मिळेल. मुले व्यवसायात पूर्ण सहकार्य करतील. भांडवलाच्या योग्य गुंतवणुकीची काळजी राहील. कलाकारांसाठी दिवस विशेष चांगला आहे. 

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज मित्रांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. रखडलेल्या कामात प्रगती होईल. व्यावसायिक कामात अत्यंत सावधगिरी बाळगावी. गुंतवणुकीसाठी दिवस शुभ राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस निराशाजनक राहील. नोकरीसाठी भटकंती करावी लागेल. मुलांकडून काही आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. भविष्याचा विचार कराल, ज्यात जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आज एकामागून एक तुमच्या इच्छा पूर्ण होताना दिसतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील वादविवाद संपतील. बोलताना सावधगिरी बाळगावी. शांत चित्ताने काम केल्यास खूप फायदा होईल. लेखकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येईल. व्यवसायाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या सुटू शकते.   

मकर (Capricorn Horoscope) : आज अधिक खर्च होऊ शकतो. कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी तुम्हाला उसने पैसेही घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. परदेशात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. स्वतःच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करा. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते. आहाराची विशेष काळजी घ्या.

कुंभ (Aquarius Horoscope) : या राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नोकरीत बदली होऊ शकते. कुटुंबात सुरू असलेला वाद संवादातून संपवावा लागेल, अन्यथा ते नाराज राहतील. वर्तमानात जगण्याचा प्रयत्न कराल. सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचे मत महत्त्वाचे ठरेल. व्यापार क्षेत्रात लाभ होईल. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच खरेदी करा.

मीन (Pisces Horoscope) : आज तुमची मेहनत फळाला येईल. नवीन सौदे फायदेशीर ठरतील. महत्त्वाच्या व्यवहारात काळजी घ्या. एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget