एक्स्प्लोर

Horoscope Today 5 March 2024 : आजचा मंगळवार खास! बजरंगबलीची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

Horoscope Today 5 March 2024 : आज मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहीलं आहे? कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? जाणून घेण्यासाठी वाचा आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 5 March 2024 : पंचांगानुसार, आज ​​5 मार्च 2024, मंगळवारचा दिवस सर्व राशींच्या दृष्टिकोनातून चांगला असणार आहे. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. ग्रहांच्या स्थितीनुसार, 5 राशीचे लोक या काळात नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कुशलतेने काम कराल, ज्यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खूश असतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील कायदेशीर बाबींमध्ये अधिक काळजी घ्या, कायद्याशी संबंधित कागदपत्रं पूर्ण ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, जर तुम्ही तुमच्या करिअरसाठी कोणताही फॉर्म भरला असेल, परीक्षा दिली असेल, तर त्या परीक्षेचा निकाल येऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता, यामुळे तुम्हाला खूप आनंदही होईल. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आज कुठे लग्नाला जायचं असेल तर तब्येत लक्षात घेऊन जाऊ शकता. तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. 

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या मनातील नकारात्मक विचार ऑफिसमध्ये काम करताना तुमच्यासाठी अडथळा आणू शकतात. त्यामुळे नकारात्मक विचार सोडून सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमचे अधिकारीही तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्याचा फायदा पाहून घाई करू नका, तुमच्या व्यवसायाकडे नीट लक्ष द्या, अन्यथा नुकसान व्हायला वेळ लागणार नाही.

विद्यार्थी (Student) - तुम्ही प्रत्येक प्रसंगात तुमचा स्वभाव शांत आणि संयमी ठेवला तर बरं होईल. कोणत्याही समस्येबद्दल गंभीर होऊ नका, कारण गांभीर्य तुम्हाला अधिक निराश करू शकतं. ग्रहांची स्थिती पाहता आज तुम्ही घरातील कामे करण्यात थोडा आळस दाखवाल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांकडून ओरडा मिळेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं कोणतंही ऑपरेशन झालं असेल तर तुम्हाला थंडीपासून स्वतःचं संरक्षण करावं लागेल आणि तुमच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल, तरच तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी सतर्क राहून काम करा, अन्यथा चांगल्या संधी तुमच्या हातून निसटू शकतात. तुम्ही त्या संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला प्रमोशन नक्कीच मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या अडचणीत अडकला असाल तर तुम्ही तुमची बुद्धी लावून त्या समस्येतून बाहेर पडू शकता.

विद्यार्थी (Student) - तुम्ही कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असाल तर जर तुम्ही स्वयंअभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल, कारण यश मिळवण्यासाठी फक्त कोचिंग पुरेसं नाही. तुम्हाला घरीही एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल. 

कौटुंबिक (Family) - जर तुम्ही तुमच्या घराचे प्रमुख असाल तर तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुम्ही भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेऊ शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आजचा दिवस सामान्य असेल. कशाचीही काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असाल. 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जाणवणाऱ्या आज संपुष्टात येतील, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप शांति मिळेल.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, ग्रहांची स्थिती लक्षात घेता तुम्हाला व्यवसायाशी संबंधित अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही तुमच्या बुद्धिच्या जोरावर सर्व आव्हानांवर मात करू शकता.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मन एकाग्र केलं पाहिजे आणि इतर गोष्टींमध्ये विचलित होऊ नये. घरगुती बाबींमध्ये तुम्ही खूप आनंदी असाल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल खूप सावध असलं पाहिजे. एक छोटीसा निष्काळजीपणा सुद्धा तुमची तब्येत पूर्वीपेक्षा जास्त बिघडवू शकतो, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःवर उपचार करुन घ्या.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, जर आज तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर बाप्पाच्या आशीर्वादाने बाहेर पडल्यास चांगलं होईल, तुमची मुलाखत चांगली जाईल आणि तुम्हाला मनासारखी नोकरी मिळू शकेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, सर्व कामांची जबाबदारी जर व्यावसायिकांवर असेल तर त्यांनी ते काम त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कमी प्रमाणात वाटून घ्यावं, जेणेकरून तुमचं काम लवकर पूर्ण होईल आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल.

विद्यार्थी (Student) - तु्म्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, त्यानंतरच यश मिळवू शकता. चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःचं रक्षण करा. आज तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा अनावश्यक खर्चामुळे तुम्ही एखाद्या अडचणीत अडकू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही जड अन्न खाणं टाळावं, जास्त तळलेले अन्न आणि जड अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले पाहिजे, तरच शरीर निरोगी होऊ शकतं.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज कामाच्या ठिकाणी अत्यंत संयमी वर्तन ठेवावं लागेल आणि सर्व काम नीट सौम्यतेने करावं लागेल. तुमचे सहकारी आज तुमच्यावर रागवू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर नफ्यापूर्वी व्यवसाय आणि बाजारपेठेत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तरच व्यवसाय प्रगती करू शकाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःला दूर ठेवावं, अन्यथा तुम्हीही चुकीच्या संगतीत अडकू शकता. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला धूळ आणि मातीची ऍलर्जी असेल तर तुमची ऍलर्जी खूप वाढू शकते. आज तुमची तब्येत असामान्य होऊ शकते. धुळीच्या ऍलर्जीमुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज ऑफिसमध्ये तुमचे तुमच्या बॉसशी अनावश्यक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. आज अजिबात वाद घालू नका.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, स्टेशनरीचा व्यवसाय केल्यास तुम्हाला आज चांगला नफा मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या वर्गमित्र किंवा दुसऱ्या मित्राबाबत काहीतरी ऐकले असेल, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावाला बळी पडू शकता. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा. कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा करू नका. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्यावर उपचार करा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला डोकेदुखीमुळे खूप त्रास होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे काळजी वाटत असेल तर आधी पूर्ण विश्रांती घ्या आणि मगच कोणतंही काम करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. भूतकाळातील चुकांमधून तुम्ही शिकलं पाहिजे. त्याच त्याच चुका पुन्हा करू नका.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. आज तुमचे कामही तितक्याच सहजतेने होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून पैसे घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या घरात पैशाचा वाद होऊ शकतो.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवून खूप आनंदी राहतील.

विद्यार्थी (Student) - तुम्ही आज सहलीला जाऊ शकतात, परंतु तुम्ही प्रवासादरम्यान थोडी काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला तुमच्या सामानाचे संरक्षण स्वतः करावं लागेल, अन्यथा तुमचं सामान चोरीला जाऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये. तुमच्या पाय आणि कंबरेला सूज येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप काळजीत पडू शकता.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर काम करण्यात पुढे असाल, तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला कामाच्या ठिकाणी वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी खूप मदत करू शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना खूप हुशारीने काम करावं लागेल, जर तुम्ही आज नवीन करार करणार असाल तर कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते नीट वाचा.

विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते, त्यामुळे तुम्हालाही अडकल्यासारखं वाटू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला तुमचं ऑफिसचं काम घरी येऊनही करावं लागेल, याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, कारण संस्थेच्या प्रगतीसाठी तुम्हाला काही अतिरिक्त काम करावं लागेल, जर संस्थेची प्रगती झाली, तर तुमच्या सुद्धा पगारात वाढ होऊ शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचे तर, जे व्यावसायिक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात आणि आपल्या भागीदारापासून दूर राहतात, त्यांनी भागीदाराशी संवाद कायम ठेवावा, तरच तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळू शकेल.

कौटुंबिक (Family) - आज तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वेळ घालवा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, फूड पॉयझनिंगची समस्या तुम्हाला भेडसावू शकते, त्यामुळे तुम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरांकडे जा, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वतःवर विश्वास ठेवावा, तरच तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकाल, यातूनच अनेक मोठे परिणाम साध्य होतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, ग्रहांची स्थिती पाहता आज व्यावसायिकांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात, तुमचे प्रलंबित सौदेही आज फायनल होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही करिअरमध्ये प्रगती करू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्ही शुगर आणि हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, कमी किंवा जास्त साखरेमुळे तुमचे आरोग्य आणखी बिघडू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani : कुंभ राशीत शनि-मंगळाचा विनाशकारी योग; देशासह जगभरात माजणार खळबळ, 'या' मोठ्या घटनांनी जग हादरणार

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget